शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार १३६ रुपये असलेली ती पर्स कोणाची? वाहकाचा प्रामाणिकपणा, पर्स आगारामध्ये केलीजमा

By साईनाथ कुचनकार | Updated: August 31, 2023 16:37 IST

पर्समध्ये कागदपत्र नसल्याने ओळख पटलीच नाही

चंद्रपूर : चंद्रपूर येथून गडचांदूर येथे जात असलेल्या एसटीतील एका सीटवर तब्बल आठ हजार १३६ रुपये असलेली एक पर्स वाहकाला दिसली. कुणीतरी महिला ती विसरून गेली. मात्र या पर्समध्ये ओळखपत्र किंवा कोणतीही कागदपत्रे नसल्याने ती पर्स नेमकी कोणाची, हा प्रश्न वाहकाला पडला. वाहकाने प्रामाणिकपणा दाखवित ती पर्स राजुरा आगारामध्ये जमा केली.

रवींद्र पिसे असे राजुरा आगारातील प्रामाणिक वाहकाचे नाव आहे. दरम्यान राजुरा आगाराने महिलेचा शोध सुरू केला आहे. हल्ली कुणाचे पाच रुपये जरी दिसले तर ते खिशात टाकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र यातही काही जण प्रामाणिकपणा दाखवून संबंधितांचे नुकसान नको, म्हणून असले प्रकार टाळतात आणि ज्यांचे कोणाचे पैसे, वस्तू असेल त्यांना देण्यासाठी त्यांची सारखी धडपड असते. अशीच धडपड सध्या चंद्रपूर येथील रहिवासी असलेले आणि राजुरा आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत असलेले रवींद्र पिसे यांची दिसून येत आहे.

राजुरा आगाराची एसटी क्रमांक एमएच ४० एन ८६०२ ही चंद्रपूर येथून मंगळवारी दुपारी ३:४५ वाजता गडचांदूरकडे निघाली. वाहन म्हणून रवींद्र पिसे कामगिरीवर होते. दरम्यान, गडचांदूर येथे ५:१५ वाजताच्या सुमारास ही बस पोहोचली. तेव्हा वाहन पिसे यांना एसटीच्या एका सीटवर एक पर्स आढळून आली. त्यांनी प्रवाशांना विचारणा केली. मात्र कुणीही समोर आले नाही.

दरम्यान, त्यांनी पर्स उघडून बघितली असता त्यामध्ये पर्समध्ये ८ हजार १३६ रुपये असल्याचे त्यांना दिसून आले. मात्र पर्समध्ये ओळखपत्रासंदर्भात एकही कागदपत्र नव्हते. यामुळे वाहकाची घालमेल अधिकच वाढली. त्यांनी थेट राजुरा आगारात येऊन ही बस आगारप्रमुखांकडे सुपूर्द केली. वाहक पिसे यांच्या प्रामाणिकपणामुळे आगारप्रमुखांनीही त्यांचे कौतुक केले. दरम्यान, ज्या कुणाची ही पर्स असेल त्यांनी राजुरा येथील आगारात संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकstate transportएसटीchandrapur-acचंद्रपूर