शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावांना पुरविणार ‘पल्स ऑक्झिमीटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करून त्यातील उणिवा दूर केल्या.

ठळक मुद्देआरटीपीआर मशीन खरेदी करणार : कोरोनाविरूद्ध वाढविणार तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात बुधवारी ३० रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११९५ झाली आहे. सध्या ३६८ बाधितांवर उपचार सुरू आहे. आजारातून बरे झाल्याने ८१५ जणांना सुटी देण्यात आली. मात्र, दररोज १५ ते २० रूग्ण वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधासाठी आता तपासण्यांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना लॅबमध्ये पुन्हा एक आरटीपीआर मशीन खरेदी केली जाणार असून सर्व गावांना ‘पल्स आॅक्झिमीटर’ पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दररोज आढावा बैठका आयोजित करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी स्कॅब चाचण्यांची संख्या वाढविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करून त्यातील उणिवा दूर केल्या. परजिल्हा व परप्रांतातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कक्षांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारपर्यंत रूग्णांची संख्या ११६५ झाली. आतापर्यंत ७७६ कोरोनामुक्त झाले. अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ३६८ अधिक झाली.कोरोनामुळे जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुसज्ज प्रयोगशाळेत दररोज १ हजार ६०० स्कॅब तपासून वैद्यकीय अहवाल जाहीर केले जात आहे. यापुढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत २० हजार १२९ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टिजेन आणि आरटीपीसीआरच्या २२ हजार ६६६ चाचण्यात करण्यात आल्या. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये ४२ हजार ८०५ पैकी ४० हजार ८६२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तपासण्यांची संख्या वाढविण्याकडे यापुढे जास्त लक्ष देण्यात येणार आहे.‘पल्स ऑक्झिमीटर’ म्हणजे काय?कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य पथकासोबत ग्रामपंचायती व स्थानिक समित्यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गावपातळीवर चाचण्या करण्यासाठी ‘पल्स ऑक्झिमीटर’ पुरविण्यात आल्या. यापुढे १०० टक्के गावांना पुरविण्यात येणार आहे. याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाशी संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेता येणार आहे. या तपासणीद्वरम्यान संबंधित व्यक्तीचा एसपीओटी ९४ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्याचा मार्ग सोपा होणार आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा सर्वच व्यक्तींच्या चाचणीवर भर दिला जाणार आहे. चाचण्यांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय साधनांची अजिबात कमतरता भासून दिला जाणार नाही. खासगी डॉक्टरांकडे कोविड १९ ची लक्षणे असणारी व्यक्ती आल्यास त्यांनी तात्काळ शासकीय रूग्णालयाकडे रेफर करावे. -अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी, चंद्रपूरतपासणीसाठी ३० हजार किट्स मागविणारकोरोनाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात सध्या १५ हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट्स उपलब्ध आहेत. यापुढे चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात ३० हजार किट्स मागविण्यात येणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या