या विस्तीर्ण उद्यानात देवाजी खोब्रागडे, प्रभूलाल टाक, विद्याधर यादव, राजाराम डुबेरे, प्रभाकरराव भास्करवार, पुंडलिक माकोडे, नारायणराव मारपल्लीवार, गीता वाटाणे, हरी प्रतापसिंह कुंजल सिंह, मुरलीधर रहीकवार, एम. बाल. बैरय्या, छबुताई मेश्राम या दिवंगत माजी नगराध्यक्षांचे फोटोही लावण्यात आले आहेत. नगरपालिकेद्वारा निर्मित या उद्यानाचे काम सा. बां. विभागाचे उपअभियंता नितीन मुत्यालवार, तसेच शाखा अभियंता वैभव जोशी यांच्या देखरेखीखाली झाले. उद्यानाचे लोकार्पण वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा, तसेच भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, सभापती येलय्या दासरप, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा वैशाली जोशी, नगरसेविका सुवर्णा भटारकर, आरती आकेवार, अरुण भटारकर आदींची उपस्थिती होती.
210921\img-20210921-wa0006.jpg
दिवंगत नगराध्यक्षांच्या स्मृतीत सार्वजनिक उद्यान
बल्लारपूर नगरपालिकेची स्तुत्य कल्पना