शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडमध्ये मोर्चा काढून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या ...

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : नागरिकत्व कायद्याविरुद्ध मुस्लीम महिला रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील विविध संघटनाच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.मोर्चाची सुरूवात जुन्या बसस्थानपासून करण्यात आली. विविध घोषणा देत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला. या कायद्यामुळे भारतीय नागरिकांचे नागरिकत्व संपुष्टात येईल व भारतीय नागरिक मुलभूत अधिकारापासून वंचित होईल, अशी भिती यावेळी व्यक्त करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नागभीड तालुक्यातील मुस्लिम महिला पहिल्यांदाच मोर्चात सहभागी झाल्या. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी ुउपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसिलदार मनोहर चव्हाण यांना शिष्टमंडळाने निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.मार्चाचे आयोजन डार्विन कोब्रा, शाहरूख शेख तसेच विविध संघटनांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी मोर्चात प्रामुख्याने जहागीर कुरेशी, पंजाबराव गावंडे , प्रा. डॉ. अनमोल शेंडे, तेरेंश कोब्रा, अ‍ॅड. आनंद घुटके, अ‍ॅड. देविदास करकाडे, गुलजार धम्मानी, इकबाल करीया, शिराज जादा, हमजू शेख, युनूश, रफी शेख, दिनेश गावंडे, ईलियास बकाली यांच्यांसह तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.मुस्लिम महिलांचा लक्षणीय सहभागया मोर्चाच्या निमित्ताने शहरातील मुस्लिम महिला पहिल्यांदाज रस्त्यावर उतरल्याचे दिसले. नागभीड मध्ये आजपर्यंत अनेक मोर्चे, आंदोलन झाली. मात्र एकदाही मुस्लिम महिलांनी यामध्ये सहभाग घेतला नसल्याचे जाणकारांचे मत आहे. यावेळी मात्र मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत नागरिकत्व कायद्याला आपला विरोध दर्शविला.

टॅग्स :Morchaमोर्चा