शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांचा ठिय्या; तरीही पाणीपुरवठा नाहीच; विसापूर ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:00 IST

Chandrapur : पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : पाण्याची कोणतीही कृत्रिम टंचाई नसताना विसापूर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनापायी मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही विसापूर गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. त्यामुळे मुबलक पाऊस पडूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे

याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे 'लोकमत'ने यापूर्वी गावकऱ्यांचा संयमाचा बांध कधीही फुटून ते मोर्चा काढून संबंधितांना धारेवर धरू शकतात, असे भाकीत केले होते. ते अखेर खरे ठरले व गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी संदीप पोडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी मोर्चा काढून ग्रामपंचायतीत ठिय्या आंदोलन केले. अखेर ग्रामपंचायतीकडून ग्रामसचिव किशोर धकाते यांनी लेखी आश्वासन देत २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, यापूर्वीही दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते. पण अजूनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे आतातरी गावकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनमुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील पंप हाऊसची इंटक मोटार ही फार जुनी असून, तिचे आयुष्य संपले आहे. ती नवीन घेण्याशिवाय पर्याय नाही, याची माहिती ग्रामपंचायतीत नवीन सत्ता बसली तेव्हाच सर्व सदस्यांना माहीत होते. 

यावर ठरावसुद्धा घेण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी आजतागायत तीच जुनी मोटार वारंवार दुरुस्त करून तिचा वापर सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना नदीला मुबलक पाणी असूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत यापूर्वी 'लोकमत'ने प्रकाश टाकला व गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे भाकीत केले होते. परंतु, कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे अखेर गुरुवारी गावकऱ्यांनी भाजपा नेते संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायतीला जेरीस आणले. यावेळी सरपंच अनुपस्थित असल्याने उपसरपंच व ग्रामसचिवांना गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागला. अखेर ग्रामसचिव किशोर धकाते यांनी २४ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापुरात मागील एक वर्षापासून ना त्या कारणाने अधूनमधून पाणीपुरवठा बंद पडत आहे. यावेळी दोन महिन्यांपासून योजना ठप्प पडली आहे. कधी वीज कपातीमुळे तर कधी पंप हाऊसची इंटक मोटरच्या बिघाडामुळे नळपाणी पुरवठा बंद असते. ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात