लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंडो फ्रान्स फोरमच्या उद्योजकांनी पर्यटनवाढीसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर रोप-वे बांधण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. हे झाल्यास ताडोबात देश-विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होईल आणि चंद्रपूर जिल्हा जगाच्या नकाशावर जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हे उद्योजक १३ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. यामुळे नागपूरच्या मिहानमध्ये ५० हजार बेरोजगारांना रोजगार मिळतील. यामध्ये चंद्रपूरच्या इंजिनीअर विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. बल्लारपूरलगतच्या बामणी येथे रविवारी ५ हजार ४५६ कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते दुपदरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
इंडो फ्रान्स फोरमच्या उद्योजकांचा ताडोबात रोप-वे चा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:14 IST
इंडो फ्रान्स फोरमच्या उद्योजकांनी पर्यटनवाढीसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर रोप-वे बांधण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.
इंडो फ्रान्स फोरमच्या उद्योजकांचा ताडोबात रोप-वे चा प्रस्ताव
ठळक मुद्दे१३ हजार कोटींची गुंतवणूक