भद्रावती तालुक्यात निप्पान डेंड्रो हा प्रकल्प रखडला आहे. याबाबत खासदार धानोरकर यांनी एकतर हा प्रकल्प सुरू करावा, अन्यथा त्याऐवजी सिमेंट वा लोह उद्योग सुरू करावा, अशी मागणी आपल्या प्रस्तावातून केली आहे. शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात भूगर्भात मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा उपलब्ध आहे. या अनुषंगाने नवीन कोळसा खाणी सुरू झाल्यास बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागेल, याकडेही लक्ष वेधले आहे. राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे प्रस्तावित विमानतळाचे काम रखडलेले आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोट
चंद्रपूर जिल्ह्यात नवीन कोळसा खाणी सुरू व्हाव्यात. निप्पान डेंड्रो प्रकल्प सुरू व्हावा, नाही तर त्या ठिकाणी कोळसा वा सिमेंट उद्योग यावा. यासोबतच मूर्ती येथील प्रस्तावित विमानतळाचे काम गतीने सुरू झाल्यास बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करता येईल, या अनुषंगाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव पाठविले आहे.
- बाळू धानोरकर, खासदार, चंद्रपूर लोकसभा मतदार संघ.