शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

म्युकरमायकोसिसवरील औषधी पुरवठ्याचे प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

आयसीयू वार्डातील रूग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रूग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रूग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रूग्णांचे मास्क निघून ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ शकतो. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कोविड व म्युकरमायकोसिस प्रतिबंधक आढावा बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोविड संसर्गानंतर म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेमडेसिविर प्रमाणेच म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन व औषध पुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, कोविड आजारातून बाहेर पडल्यानंतर रूग्णांची साखर वाढणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. यावर विशेष लक्ष दिल्यास रोगावर मात करता येऊ शकेल. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण, मृत्युदर वाढत आहे. त्यासाठी विविध कारणे समोर येत आहेत. त्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला               दिल्या. 

आयसीयु वार्डात गंभीरतेने लक्ष द्याआयसीयू वार्डातील रूग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रूग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रूग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रूग्णांचे मास्क निघून ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ शकतो. याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

म्युकरमायकोसिससाठी वेगळा कक्षम्युकरमायकोसिस रोगाच्या उपचारासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीला तीव्र डोकेदुखी, डोळेदुखी, डोळ्यांवर सूज व नाक बंद होणे यासारखी लक्षणे आढळल्यास कक्षाशी संपर्क साधावा. या रोगावर तातडीने उपचार, उपाययोजना व जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले. 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या