लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बरेच व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशातच बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ यासह इतर कारणांमुळे अनेकांची घर बांधण्याचे स्वप्न सध्या लांबणीवर पडले आहे. याशिवाय इतरही बांधकामे संकटात सापडली आहेत. अशातच लॉकडाऊन व महागाईचा फटका घरकुल योजनेसह अन्य कामांना बसला आहे. लॉकडाऊ नमुळे बांधकाम क्षेत्रावर अवकळा आल्यामुळे गवंडी व मजुरांवर घरीच ठाण मांडून बसण्याची वेळ आली आहे.आपल्या हक्काचे घर हवे, अशी अपेक्षा अनेकांनी असते. परंतु कोरोनामुळे मजुरांची अडचण व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता नवीन घराची स्वप्नपूर्ती यावर्षी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरूवातीला बांधकाम साहित्याचे भाव सर्व सामान्य व्यक्तींच्या आवाक्यात होते. त्यामुळे यांना आपले स्वत:चे घर होईल, अशी आशा अनेकांना होती. घर बांधण्याचा खरा मुहूर्त मार्च, एप्रिल व मे महिन्यात असतो. परंतु याच काळात कोरोनाची साथ पसरली. परिणामी लॉकडाऊ न व संचारबंदीमुळे बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वाढले. वीटभट्टया बंद आहेत. सिमेंट, लोखंडाची दरवाढ झाली. वाळू २८ ते ३० हजार, गिट्टी १५ हजार रूपये मिळत असल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचण जात आहे.उदरनिर्वाह करणे कठीणकोरोनामुळे लॉकडाऊ न सुरू आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढल्याने व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बांधनकारक आहे. अशातच मजूर मिळणेही कठीण झाले आहे. लॉकडाऊ न आदी तीन ते चार ठिकाणी कामे करत असत. परंतु आता काम आहे तरी मटेरियल नाही अन मजूरही मिळत नसल्याने अडचणीत आहेत.
घरकुल बांधण्याचे स्वप्न लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST
आपल्या हक्काचे घर हवे, अशी अपेक्षा अनेकांनी असते. परंतु कोरोनामुळे मजुरांची अडचण व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता नवीन घराची स्वप्नपूर्ती यावर्षी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरूवातीला बांधकाम साहित्याचे भाव सर्व सामान्य व्यक्तींच्या आवाक्यात होते. त्यामुळे यांना आपले स्वत:चे घर होईल, अशी आशा अनेकांना होती. घर बांधण्याचा खरा मुहूर्त मार्च, एप्रिल व मे महिन्यात असतो.
घरकुल बांधण्याचे स्वप्न लांबणीवर
ठळक मुद्देअडचणी वाढल्या : बांधकामावरही आले निर्बंध