शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोठारी येथे कडकडीत बंद, नवरगावात निषेध रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:30 IST

कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देटायर जाळले : कोरेगाव भीमा घटनेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी/नवरगाव : कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. कोठारीत तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आले. मुख्य रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. याप्रकरणी ३० ते ३५ आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.कोठारी येथे दुपारी १२ वाजता बुद्ध विहाराजवळून मोर्चाची सुरूवात झाली. बस स्थानक परिसरात मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बल्लारपूर-गोंडपिपरी रस्ता दोन तास अडवून धरला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. यावेळी दोषींवर कारवाईच्या मागणीचे निवेदन बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले. राजकुमार परेकर, भारिप बंमस महासचिव धिरज बांबोळे, बसपा महासचिव वेणुदास खोब्रागडे, रिपाई (आ) शैलेश रामटेके, काँग्रेसचे विनोद बुटले यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.नवरगावात निषेध सभानवरगाव : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ नवरगाव येथे गुरुवारी रॅली काढुन निषेध सभा घेण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास येथील बुद्ध विहारापासून सुरूवात झाली. अहिल्याबाई होळकर चौक, आझाद चौक, गुरुदेव चौक, दुकान चौक मार्ग गुजरी चौकात रॅली पोहचली. त्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. विविध पक्षाच्या सामाजिक संघटनानी यावेळी मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये बौद्ध बांधव शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा दगडा बंदोबस्त होता.८० जण सुखरूप परतलेमाजरी : कोरेगाव भीमा येथील महोत्सवात सहभागी होण्यासाठी माजरी येथील ८० जण आपल्या परिवारासह दोन ट्रॅव्हल्समध्ये गेले होते. ते सर्व जण सुखरूप परतले आहेत. परंतु, कोरेगाव भीमामध्ये घडलेल्या घटनेमुळे त्यांना महोत्सवात सहभागी होता आले नाही. दगळफेक व जाळपोळनंतर तिथे कुणालाही जाऊ दिले नाही. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लहान मुलांना कोणताही दुखापत होऊ नये म्हणून आम्ही सर्व जण परत आलो, अशी माहिती आंबेडकर चळवळीचे राजेंद्रप्रसाद गेडाम, मुकुंद वासनिक, भीष्मा वालदे, मिलिंद रामटेके, गुरुदास भगत आणि महादेव दुपारे यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव