शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाची प्रगती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले.ब्रह्मपुरी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा- ब्रह्मपुरीच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. उद्घाटन ब्रह्मपुरीचे ठाणेदार विलास चव्हाण यांच्या हस्ते अंधश्रध्देचे प्रतीकअसणाºया लिंबू मिरचीच्या तोरणाला ...

ठळक मुद्देहरिभाऊ पाथोडे : अं.भा. अनिसचे कार्यकर्ता प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: समाजात आजही अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यावर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार हरिभाऊ पाथोडे यांनी व्यक्त केले.ब्रह्मपुरी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा- ब्रह्मपुरीच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. उद्घाटन ब्रह्मपुरीचे ठाणेदार विलास चव्हाण यांच्या हस्ते अंधश्रध्देचे प्रतीकअसणाºया लिंबू मिरचीच्या तोरणाला कापून करण्यात आले. हरिभाऊ पाथोडे यांनी देवधर्माविषयक भूमिका मांडतांना संत परंपरा, मानवी उत्क्रांती, मानवी मेंदू व विचारप्रक्रिया, शब्दप्रामाण्य, अचिकित्सा, वैज्ञानिक दृष्टीकोन, बुध्दीप्रामाण्यवाद आदी पैलुंवर मौलिक मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रध्दा यावर भाष्य केले. अध्यक्ष डॉ. खिजेंद्र गेडाम यांनी अध्यक्षीय भाषणात आरोग्यविषयक अंधश्रध्दा यावर विचार मांडले. उद्घाटकीय सत्राचे आभार प्रा. आकाश मेश्राम यांनी व्यक्त केले.दुसºया सत्रात केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी जादूटोणाविरोधी कायद्याविषयी माहिती दिली. तिसºया सत्रात जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम हे राष्ट्र उभारणीचे कार्य आहे, असे मत मांडले. तंत्रतंत्र, जादूटोना, करणी, अघोरी प्रथा यावर मार्मिक भाष्य केले. जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी बुवाबाजी व चमत्कार या विषयावर विविध चमत्कारांच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.समारोपीय सत्रात हरिभाऊ पथोडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण व संत परंपरा यावर मार्गदर्शन केले. या सत्रात श्रोत्यांच्या मनातील विविध प्रश्नाची समर्पक उत्तरे मान्यवरांनी दिली. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. एकंदरीत संपूर्ण दिवसभर विविध वक्त्यांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये कोमल गडे, वैशाली देशमुख, डॉ. मनिषा वनवाडे आदींचा समावेश होता. संचालन तालुका संघटक प्रा. बालाजी दमकोंडवार यांनी केले. प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय सुजित खोजरे यांनी केले. शशिकांत बांबोळे यांनी आभार मानले.आयोजनासाठी डॉ. खिजेद्र गेडाम, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, सुजित खोजरे, डॉ. शशिकांत बांबोळे, अभिजित कोसे, भिमानंद मेराम, रविंद्र बिखार, प्रा. राजू आदे, प्रा. आकाश मेश्राम, प्रा. मिलींद पठाडे, चंदू कावरे, संजय चवहाण, डॉ. योगेश बनवाडे, डॉ. प्रशांत राखउे, प्रा. प्रशांत मत्ते, सुदाम राठोड, सरिफ मलामे, रजनी सुर्यवंशी, प्रिती मेश्राम, विवेक रामटेके, वर्षा दशमवार व ब्रह्मपुरी येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.