शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:39 IST

नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी : नऊ धानाच्या वाणांचे संशोधन करून जगभरात नावलौकिक मिळविलेले कृषीभूषण तथा एच.एम.टी. धानाचे संशोधक स्व. दादाजी खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड या त्यांच्या गावी सोमवारी (दि.३) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.नागभीड तालुक्यातील लहानश्या खेड्यात दादाजी रामाजी खोब्रागडे यांनी आर्थिक परीस्थितीवर मात करून धानाच्या विविध जाती शोधून काढल्या. त्यात एच. एम.टी. नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, विजय, नांदेड, दीपक रत्न अशा प्रकारच्या अनेक प्रजातीचे वाण शोधून काढले. परंतु एच.एम.टी. धान बारिक वाण असल्यामुळे त्याची जगभर प्रसिध्दी करण्यात यश आले. सुनेला मिळालेल्या २.५ एकर जमिनीतून विविध प्रकारच्या धानाचे वाण शोधून प्रथम विदर्भात त्यानंतर हळुहळू जगभरात त्यांच्या वाणाचे संशोधन झाले. अशा संशोधक शेतकऱ्याला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुरस्कृत केले. स्व. दादाजी खोब्रागडे यांना कृषीभूषण पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. तसेच फोर्ब्स या जगात प्रसिध्द असलेल्या पुस्तकात जगभरातील ग्रामीण उद्योगांच्या यादीत त्यांचा समावेश झाला. जागतिक पातळीवर त्यांनी देशाचे नावलौकिक केले.कृषी क्षेत्रात भरीव काम करून जगाला दखल घेण्यास प्रेरित करणारा कृषीभुषण दादाजी खोब्रागडे यांचे मागील वर्षी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले होते. दादाजींच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी कुटुंबीयांतर्फे नांदेड या त्यांच्या गावी स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती