जडवाहतुकीला आळा घालावा
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मोठ्या वाहनांद्वारे आणण्यात येत आहे. काही रस्त्यांची क्षमता ही कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसील कार्यालये गर्दीने फुलले
चंद्रपूर : जिल्ह्यातील तहसील कार्यालयात नागरिकांची विविध कामानिमित्त गर्दी दिसून आली. आगामी काळात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी व गावगाड्यातील नागरिकांची समर्थनार्थ गर्दी झाली होती.
बॅंकेत पैसे काढण्यासाठी गर्दी
चिमूर : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची आगामी काळात निवडणूक आहे. त्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व किसान सन्मान योजनेची रक्कम खात्यात जमा झाल्याने ती काढण्यासाठी बँकात गर्दी वाढली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेतली आवक वाढली आहे.
--------
आठवडी बाजारात सुविधा पुरवाव्या
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर आठवडी बाजार बंद होते. दरम्यान, प्रशासनाने मागील महिन्यापासून बाजार सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र येथे सुवधिा नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना, सिंदेवाही, नागभीड, भद्रावती आदी तालुक्यांत आठवडी बाजार भरतात.