मनोधैर्य वृद्धी : मध्यवर्ती कारागृहात मार्गदर्शनचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये सामाजिक प्रबोधन व गीत गायन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने बंदिवानांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश महासचिव अॅड. गणेश गिरधर यांनी हा प्रबोधन व गीतगायन कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम गणेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ कारागृह अधीक्षक आडे, तुरुंग अधिकारी खैरे व सैय्यद, ललित मुंडे आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद दहीवले आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये कारागृहातील बहुसंख्य बंदीवानांनी सहभागी होवून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार असल्याचे अॅड. गिरधर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कैद्यांनी गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावे
By admin | Updated: August 1, 2016 00:39 IST