शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST

महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुरेश धानोरकर। ‘लोकमत’जवळ स्पष्ट केला चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोईसाठी वर्धा नदीवर पाच बॅरेजची गरज आहे. जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करणे आणि नवीन उद्योग जिल्ह्यात कसे येईल, या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा भविष्यात प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तब्बल १५ वर्षानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सुरेश धानोकर यांच्या रुपाने काँग्रेसने भाजपच्या ताब्यात असलेला गड परत मिळविला. धानोरकरांच्या रुपाने काँग्रेसला अख्ख्या महाराष्ट्रात चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व मिळाले आहेत. या मतदारसंघाबाबत त्यांनी तयार केलेला ‘रोडमॅप’ नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खासदार धानोरकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्याचा एक भागच आदिवासी बांधवांचा आहे. त्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. त्यांचा घरकुलाचा प्रश्न गंभीर आहे. आदिवासी बांधवांना घरकुल उपलब्ध करून देणे हा आपला पहिला प्रयत्न असणार आहे.वर्धा नदी ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. परंतु शेतकऱ्यांना या नदीच्या पाण्याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी शेती तोट्यात चालली आहे.शेतकºयांचे जीवनमान उंचवायचे असेल तर सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी वर्धा नदीवर राजुरा ते वरोरापर्यंत ठिकठिकाणी पाच बॅरेज बांधण्याची नितांत गरज आहे. यामुळे शेतकºयांना थेट लाभ होईल. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील ८० टक्के उद्योग हे बंद पडलेले आहे.यामुळे बेरोजगारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बेरोजगांचे प्रश्न सोडविण्यासाठी बंद पडलेले उद्योग कसे सुरू होतील, हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यात नवीन उद्योग कसे येतील, यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी नमूद केले.संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी...चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी ही आपली मागणी नाही. दारुबंदीचा फायदा अन्य राज्यांना होत आहे. महाराष्ट्राला मिळणारा महसूल अन्य राज्याला मिळत आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑातच दारूबंदी केली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी, ही आपली मागणी नाही, या शब्दात खासदार सुरेश धानोरकर यांनी दारूबंदीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस