शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मागील खरिपाचा ७२ लाखांचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: July 8, 2014 23:22 IST

२०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे

चंद्रपूर : २०१३ च्या खरीपाचा ७१ लाख ७३ हजार रुपये पीक विमा शासनाने मंजूर केला असून याचा लाभ जिल्ह्यातील सहा हजार १२५ शेतकऱ्यांना होणार आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त आवाहन केले.यावर्षीची पिक परिस्थिथती पाहता शेतकऱ्यांनी पिक विमा भरावा असे सांगतानाच ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही. त्यांनी कृषी सहाय्यकाचे प्रमाणपत्र घेवून ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत पिक विमा हप्त्याची रक्कम भरावी. जेणेकरुन या परिस्थितीतही पिक विमा योजनेचा लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने खरीप २०१४ हंगामाकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजना नुकतीच मंजूर केली आहे. चालू वर्षी मौसमी पाऊस जिल्ह्यामध्ये सुरु झालेला नाही. पिक विमा योजनेमध्ये अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळू शकते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. चालू खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, सोयाबिन, कापूस व इतर पिकांसाठी लागू राहणार आहे. खरीप पिकांसाठी सर्वसाधारण जोखीमस्तर ६० टक्के आहे व जास्तीत जास्त सरासरी उत्पन्नाच्यया १५० टक्के पर्यंतविमा संरक्षण घेता येईल. सर्वसाधारण विम्याचा हप्ता २.५ ते ३.५ टक्के आहे. कापूस पिकाचा विमा हप्ता दर १३.०० टक्के आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१४ आहे. योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये १० टक्के अनुदान सुद्धा मंजूर आहे. तेव्हा जिल्ह्यातील चालू वर्षाची पाऊसाची परिस्थिथती लक्षात घेता शेतकऱ्यांनीपेरणी केलेल्या पिकांचा विमा हप्ता तातडीने नजीकच्या बँकेमध्ये भरावा व पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)