शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

प्रधान सचिवांची मांडवगोटा येथे भेट

By admin | Updated: April 2, 2015 01:29 IST

महापाषाण युगीन काळातील पुरातन पार्श्वभूमी असलेल्या मांडवगोटा या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाला राज्याचे प्रधान सचिव प्रविण परदेसी यांनी भेट दिली.

शंकरपूर : महापाषाण युगीन काळातील पुरातन पार्श्वभूमी असलेल्या मांडवगोटा या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाला राज्याचे प्रधान सचिव प्रविण परदेसी यांनी भेट दिली. या भेटीत उत्कृष्ट पर्यटन स्थळ करण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.शंकरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर येथे हा मांडवगोटा अस्तित्वात आहे. हे स्थळ शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाने प्रकाशझोतात आणले आहे. मंडळाच्या सहकार्याने डेक्कन पुरातन व संशोधन विद्यापीठ पुणे येथील डॉ. कांती पवार यांनी सलग सन २०१० पासून ते सन २०१३ पर्यंत तीन वर्ष उत्खनन केले. या उत्खननात तांब्याची नाणी, बांगड्या, लोह अवजारे, सातवाहन कालीन विटा, मडके, मातीचे खापरे आदी साहित्य मिळाले. या सर्व निष्कर्षावरून हे बावीसशे वर्ष पुरातन असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मांडवगोटा भारतातील सर्वात मोठी शवगृह असल्याचे पुरातन विभागाचे डॉ. कांती पवार यांनी सांगितले आहे.हा मांडवगोटा चार मुरमाळी दगडावर उभा असून हा दगड जमिनीपासून वर सहा फुट, जमिनीखाली सहा फुट सलग एक दगड आहे. त्याच्यावर १० बाय १२ बाय २ फुटाचा वालुकाई दगड ठेवलेला आहे. या मांडवगोट्याचे दोन भाग केले असून दोन्ही भागात दरवाजे आहेत. यासारखेच पण आकाराने लहान तीन शवगृह या मांडवगोट्याच्या मागे आहेत. पण ते भग्नाअवस्थेत आहेत. सभोवताल मुरमाळी दगडाची संरक्षण भिंत उत्खननात आढळून आली आहे.या मांडवगोट्याला पर्यंटनस्थळाचा दर्जा मिळण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळ कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा मांडवगोटा वनविभागाच्या जमिनीवर असल्याने वनविभागाच्या सहकार्याने पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी या स्थळाचे महत्व ओळखून तार जाळीची संरक्षण भिंत तयार करून दिली आहे. तिथे बगिचा निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. प्रधान सचिव प्रविण परदेसी यांना या स्थळाची माहिती देऊन त्यांना या स्थळापर्यंत आणले. त्यांनी या मांडवगोट्याची पाहणी केली. हा ऐतिहासिक ठेवा असल्याने व सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.