टायर जाळलेल्या उजेडात वीज दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:44+5:30

घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला. चंद्रपूर-मूल या ३३ केव्ही वाहिनीवरून परिसरातील सुमारे २६ गावांना विद्युत पुरवठा होतो.

 Power Repair in Tire Burning Light | टायर जाळलेल्या उजेडात वीज दुरूस्ती

टायर जाळलेल्या उजेडात वीज दुरूस्ती

Next
ठळक मुद्दे२६ गावांमध्ये प्रकाश : वीज कर्मचाऱ्यांचे युद्धस्तरावर प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला.
चंद्रपूर-मूल या ३३ केव्ही वाहिनीवरून परिसरातील सुमारे २६ गावांना विद्युत पुरवठा होतो. शनिवारी २ या परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसल्याने गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. या बिघाडाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या ग्रामीण उपविभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता प्रशांत आवारी, तंत्रज्ञ सुशांत जुनघरे, अमन नैताम, हैसत खोब्रागडे व कंत्राटदार सुनील ठावरी सहकार्यांनी जीवाची बाजी लावून घनदाट अरण्यातील बिघाड शोधून काढला. रात्रीच्या अंधारात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी टायरच्या उजेडात काम पूर्ण केले. यामुळे अवघ्या ८ तासात परिसरातील २६ गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले. नागपूर विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले, अशी माहिती कर्मचाºयांनी दिली.

Web Title:  Power Repair in Tire Burning Light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज