कोरपना : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावात डीपी उघड्या राहतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ब्रह्मपुरी-वडसा बायपास मार्ग तयार करा
ब्रह्मपुरी : शहरातील वर्दळ लक्षात घेता अपघाताला निमंत्रण देण्यापूर्वी ब्रह्मपुरी-वडसा रोडवर बायपास रोड ताबडतोब निर्माण करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
नवतळा मार्गाची दुरुस्ती करावी
चिमूर : तालुक्यातील पिंपळगाव-नवतळा ही गावे ८ किमी अंतरावर आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त
सिंदेवाही : नवरगाव-रत्नापूर येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवरगाव-रत्नापुरातील विद्युत पुरवठा वारंवर खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते.
रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या १० वाहन चालकांवर पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी तीन, ब्रह्मपुरी सहा तर वरोरा पोलिसांंनी एका वाहनचालकावर कलम भादंवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
पोंभुर्णा : तालुक्यातील जंगलाला लागून असणाऱ्या शिवारात रानटी डुकरांचा हैदोस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे निवेदन देण्यात आले.
पीक विमा रक्कम तातडीने द्यावी
वरोरा : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील पीक वाया गेले होते. विम्याची रक्कम मिळाली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.