शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

९५८ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:55 IST

मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू असताना कडक उन्ह तापत आहे. अशातच अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा कृती आराखडा तयार : तीन टप्प्यात होणार उपाययोजना

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू असताना कडक उन्ह तापत आहे. अशातच अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. ही समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९५८ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तीन टप्प्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी अंदाजे १८ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांचा खर्च येणार आहे.गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तसेच नदी-नाले पूर्ण भरले नाही. परिणामी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे स्त्रोत असलेले नदी-नाले कोरडे पडले असून आतापासूनच काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ९५८ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे कृती आराखड्यात म्हटले आहे.पाणीटंचाई निर्माण होणाºया गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी आॅक्टोबर ते डिसेंबर असा पहिला टप्पा, जानेवारी ते मार्च दुसरा तर एप्रिल ते जून महिन्यात करायच्या उपाययोजना असा तिसरा टप्पा तयार केला आहे. या तीन टप्प्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये अप्रचलित उपाययोजनांमध्ये विहीरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोअर, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे तर प्रचलित उपाययोजनांमध्ये प्रगतिपथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहीर हातपंपासह देणे, नवीन कुंपनलिका देणे, तात्पुरती पूरक योजना राबविणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, हातपंपाची दुरूस्ती, धरणामध्ये, तलावामध्ये चर खोदणे अशी कामे केली जाणार आहेत.प्रचलित उपाययोजनांमध्ये पहिल्या टप्प्यात २७३ गावांमध्ये २९७ कामे, दुसºया टप्प्यात २५३ गावांमध्ये ३२५ कामे तर तिसºया टप्प्यात ४५ गावांमध्ये ६२ कामे केली जाणार आहेत. यासाठी १७ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे कृती आराखड्यात म्हटले आहे.१३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारसंभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. मार्च ते जून या महिन्यात १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असून ५ लाख ८५ हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. या तेरा गावांमध्ये भद्रावती तालुक्यातील एक, राजुरा तालुक्यातील ४ तर जिवती तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.१८ कोटी ८१ लाखांचा खर्च अपेक्षितजिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या ९५८ गावांमध्ये उपाययोजना म्हणून १३६१ कामे आराखड्यात घेण्यात आली आहेत. यासाठी १८ कोटी ८१ लाख १० हजार रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे. यामध्ये अप्रचलित उपाययोजनांसाठी ३८७ गावांमध्ये ६७७ कामे करण्यासाठी १ कोटी ७६ लाख २५ हजार रूपये तर प्रचलित उपाययोजनांमध्ये ५७१ गावांमध्ये ६८४ कामे करण्यासाठी १७ कोटी ४ लाख ८५ हजार रुपयाचा खर्च येणे अपेक्षित आहे.नळ योजनांच्या दुरूस्तीवर भरथकीत विद्युत देयके, पाईपलाईन फुटणे अशा कारणांमुळे अनेक नळ योजन बंद असतात. तर पाणी पातळी खालावल्याने किंवा नदीची धार आटल्यानेही काही नळ योजना बंद पडतात. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असते. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने विशेषता नळ योजनांच्या दुरूस्तीवर जास्त लक्ष दिले जाणार आहे. यासाठी १० कोटी २३ लाखांचा खर्च अंदाजीत करण्यात आला असून १९५ गावांचा यात समावेश आहे.