निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:35+5:30

यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते.

The poor will never starve | निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । ४० हजार कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटपाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : लॉकडाऊनमुळे निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टवार यांनी केले. जिल्ह्यातील ४० हजार निराश्रित कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. हा उपक्रम १५ दिवस सुरू राहणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते. सावली व सिंदेवाही तालुक्यात रविवार तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ६ एप्रिलपासून टप्पाटप्प्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बंडू श्याम वाघाडे, मुक्ता महादेव वैरकर, गोविंदा बाबुराव मडावी, प्रिया प्रमोद राऊत, यमुना गोविंदा राऊत आदींसह ५० गरजुंना धान्य व जीवनावश्यक किट देण्यात आले. रविवारी सिंदेवाही व सावली तालुक्यात, ६ एप्रिलपासून चंद्रपूर, बल्लारपूर तालुक्यात वस्तुंचे किट वाटप होणार आहे. यामध्ये १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, १ किलो मीठ, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांसाठी शासकीय योजनव्यतिरिक्त स्वखर्चातुन ४० हजार कुटुंबांना वस्तुंचे किट देण्यात येणार आहे.

शिवभोजन थाळी
केंद्राचे उद्घाटन

ब्रह्मपुरी तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात भोजन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाशी राणी चौक ब्रह्मपुरी येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. या केंद्रातून दररोज १०० थाळी वितरित होणार आहे. ही थाळी अवघ्या ५ रूपयात मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: The poor will never starve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.