बोरगाव पाणीपुरवठा योजना बंद : दूषित पाण्याचा पुरवठाचंदनखेडा : स्थानिक ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठ्यातील दोष, देखभाल व दुरुस्तीविषयची अनास्था अशा अकार्यक्षम धोरणामुळे नळाद्वारे लालसर व पिवळ्या रंगाचा गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने चरुर बोरगाव येथील पाणी पुरवठा गत तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चरुर वासीयांना शेतशिवारातील नाईलाजास्तव विहिरीचे दुषित पाणी प्यावे लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चरूर बोरगाव येथे १९७८ ला एक लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना तत्कालीन सरपंच मनोहरराव आगबत्तनवार यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आली. काम चांगले झाल्याने ही नळयोजना ३७ वर्षे लोटूनही योग्य व सुस्थितीत आहे. परंतु सन २००७ ला जलस्वराज्य योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठासाठी ६० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना मंजुर झाली. दोन्ही नळ योजनासाठी गावालगतच्या इरई नदीवरुन पाणी घेतले जात असून त्याचा पुरवठा ग्रा.पं. अंतर्गत येत असलेल्या चंदनखेडा, मक्ता, चरुर व बोरगाव या गावासाठी केला जातो. परंतु जलस्वराज योजनेत पाणीपुरवठा समितीच्या नियंत्रणात असतानाही नळ योजनेचे काम कमकुवत झाले. जवळपास अधिकाधिक काम दोषपूर्ण असताना देखील ही नळयोजना ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली गेली. नदीवरील जलस्वराज्य योजनेच्या उघड्या विहिरीला झाकण नसल्याने पालापाचोळा पक्षी, प्राणी आत पडून कुजून पाणी दुषित होत आहे. यावर उपाययोजना म्हणून जुन्या टाकीद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु सदर टाकीची क्षमता ही चार गावासाठी तोकडी पडत असून फक्त चंदनखेडा व मक्ता गावास थोड्याशा पाण्यावरच समाधान माणून वाढीव पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. चरुर बोरगाव या गावास तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने बोरगाव वासियांना बोअरवेलचा पर्याय शोधावा लागला. तर चरुर येथे गावालगतच्या शेतशिवारातील विहिरीतील दुषित पाणी पिण्यासाठी उपयोगात आणावे लागत आहे. त्यामुळे हगवण, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आदी जलजन्य रोग बळावण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)सद्यस्थितीत पावसामुळे अनेक मासे नदीच्या पात्रात मृत्यू पावल्याने पाण्याची दुर्गंधी येत असून पाणी दूषित झाले आहे. गावकऱ्यांकडून सुटणे अनेक तक्रारी होत असून आरोग्याच्या दृष्टीने जलस्वराज्य योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जुन्या टाकीची क्षमता कमी पडत असल्याने गत तीन दिवसापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.- नरेश धवने, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. चंदनखेडाचरुर येथील गावकऱ्यांना गावालगतच्या शेतशिवारातील विहिरीतील मेलेले श्वापद, कचरा असलेले दूषित पाणी नाईलाजास्तव पयावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.- विलास झाडे, चरुर ग्रामवासी
चरूरवासी पितात नाल्यातील गढूळ पाणी
By admin | Updated: July 2, 2015 01:20 IST