हे ट्रक पार्किंग कारखान्याच्या आत किंवा गावाबाहेर हटविण्याची मागणी आहे. वाॅर्ड क्रमांक ६ च्या लोकवसाहतीला १० फुटांच्या रस्त्यानंतर लायडचे वालकम्पाउंड असून, ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी कारखान्याचा रस्ता आहे. दिवसरात्र होणाऱ्या वाहनाच्या वर्दळीपासून रस्त्यावरील धूळ व वाहनांच्या कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणामुळे कारखान्यानजीकच्या नागरिकांना त्रास होत आहे. या कारखान्याचे विस्तारीकरण होत आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जनसुनावणी घेतली. दरम्यान, लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करीत आधी कार्यरत असलेल्या कारखान्याचे प्रदूषण नियंत्रण करा, मगच नवीन प्राेजेक्टला परवानगी द्या, अशी मागणी केली. रस्त्यावर पाण्याचा शिडकाव करा, अशी मागणी केली. दरम्यान, कारखान्याच्या व्यवस्थापकांनी दररोज टँकरने पाणी टाकण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता त्यांनाच याचा विसर पडला आहे.
लायड मेटल कारखान्याच्या ट्रक पार्किंगमुळे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST