निवडणूक : ८६ उमेदवार, २०,५०३ मतदार घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नगरपरिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी येथे लढतीत असलेल्या राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. या नगरपरिशदेची किल्ली कोणाच्या हातात द्यायायची, याचा निर्णय नागभीड कर आज बुधवारी घेणार आहेत. येथील नगरपरिषदेच्या ८ प्रभागातील १७ जागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी ८६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना २० हजार ५०३ मतदार मतदान करणार आहेत. बहुतेक प्रभागात काँग्रेसविरूद्ध भाजप असा थेट सामना असला तरी काही प्रभागात तिसरी आघाडी व अपक्षांचाही जोर आहे. येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे दिनेश गावंडे व मानपचे नरेंद्र हेमणे यांच्यात थेट सामना आहे. प्रभाग क्र.२ मध्ये अपक्ष अमित संदोकर, काँग्रेसचे सुभाष राऊत व भाजपचे गौतम राऊत यांचेत तिहेरी लढत आहे. याच प्रभागातील ब गटात काँग्रेसचया श्यामल जिवतोडे व भाजपच्या अर्चना मरकाम एकमेकीशी निकराची झुंज देत आहेत. प्रभाग क्र.३ मध्ये दोन्ही गटात भाजप विरूध्द काँग्रेस असाच सामना दिसून येत आहे. काँग्रेसचे बाबुराव बारेकर व आशा गायकवाड भाजपचे उमेदवार रूपेश गायकवाड व अर्चना देवारी यांचेत लढत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये उमेदवारांची संख्या लक्षात घेता कोण कोणावर भारी ठरेल याचा अंदाजच येईनासा झाला आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये काँग्रेसचे संजय अमृतकर व भाजपचे प्रदीप तर्वेकर, प्रभाग ६ मध्ये भाजपाचे गणेश तर्वेकर काँग्रेसचे दीपक गिरीपुजे व तिसऱ्या आघाडीचे मो. जहाँगीर कुरेशी, महिला प्रवर्गातही याच पक्षांच्या प्रा. डॉ. रेखा जगनाडे, दुर्गा चिलबुले आणि मीना अमृतकर, प्रभाग ७ मध्ये काँग्रेसचे नंदू खापर्डे व भाजपाचे दशरथ वुके, या गटातील महिला प्रवर्गात काँग्रेसच्या सुवर्णा टिपले भाजपाच्या अंजली येरणे आणि तिसऱ्या आघाडीच्या धनश्री काटेखाये यांची उमेदवारी आहे.प्रभाग क्र. ८ मध्ये काँग्रेसकडून प्रतिक असीन, सुनंदा माटे व सोनाली दांडेकर तर भाजपकडून सचिन आकुलवार, सीमा कुथे व रोहिणी गजबे आदी उमेदवार थेट लढत देणार आहेत. नगराध्यक्षपदाकतिता आठ उमेदवार रिंगणात आहेत.
न.प.च्या १७ जागांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 02:08 IST