शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मोबाईल अन् मद्याने कालवले अनेकांच्या सुखी संसारात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण जग जवळ करणारा मोबाइलच पती-पत्नीच्या दुराव्याचे मुख्य कारण बनत असल्याचे चित्र भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. सततचा मोबाइल वापर व मद्याने सुखी संसारात विष कालवल्याचे मागील वर्षभरात भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येते. भरोसा सेलने ११ महिन्यांत ८५१ तक्रारी आल्या. त्यापैकी ७७१ तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांना यश आले आहे. कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्या नेतृत्वात दोघांचीही समजूत घालून समुपदेशनातून पुन्हा मेळ घालून दिला. त्यामुळे पूर्वी ‘तुझे माझे जमेना’ म्हणणारे दाम्पत्य आता ‘तुझ्यावाचून करमेना’ म्हणत आहेत.

चारित्र्यावर संशय हेही कारण

nसेलकडे येत असलेल्या तक्रारीमध्ये चारित्र्यावर संयश घेणे यासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दारू पिऊन मारहाण करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, व्हॉटस्ॲप चॅट पाहता येऊ नये म्हणून कोडवर्ड टाकणे यातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. किमान ४० टक्क्यांच्या जवळपास पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतो, असे कारण नमूद आहे. 

समुपदेशनातून २६४ कुटुंबांत फुलले हास्य

पती-पत्नीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याची तक्रार केली जाते. त्यानंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे येते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१मध्ये भरोसा सेलकडे ८५१ तक्रारी आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी स्वत: पती-पत्नीचे समुपदेशन करून २६४ कुटुंबांत हास्य फुलविले आहे. मागील वर्षी ६८ प्रकरणांत समझोते करण्यात आले होते. यंदा ही आकडेवारी वाढून २६४ कुटुंबांत समझोता करण्यात यश आले आहे. 

बायकोचा जाच वाढलामहिलांच्या तक्रारींचा ओघ अधिक असला तरी निवड प्रमाणात पुरुषांच्यादेखील पत्नीविरुद्ध तक्रारी आहेत. पहिली बरी होती. आता तिचा स्वभाव बदलला असून जाच वाढल्याचे काकुळतीने म्हणणारे पत्नीपीडित आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीMobileमोबाइल