शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रात पालिकेकडून नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:54 IST

चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्देउमा नदीचे पात्र उथळ : विहिरीचा जलस्तर वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.चिमूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे जलस्त्रोत कोरडे होत आहेत. परिणामी चिमूर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यात भारनियमनाची भर पडली आहे. शहराला कायमस्वरूपी सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. परंतू त्यानंतर नदीचे खोलीकरण केले नाही. त्यामुळे पुरातील वाळू, मातीमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. पात्रात आता नावालासुद्धा वाळू दिसत नाही. पात्र जमिनीसारखे टणक झाले आहे. त्यामुळे पात्रातील पाणी भूगर्भात जिरत नाही. याचा परिणाम या स्त्रोतावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर झाला आहे. तिथे आता अत्यल्पसाठा उपलब्ध आहे.शहरातील पाणी टंचाईची स्थिती बघता पात्राच्या खोलीकरणाची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागितली आहे. मात्र, परवानगीची प्रक्रिया किचकट असल्याने त्याला उशीर लागणार आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवी शक्कल शोधली आणि नदीपात्रातील बंधाºयाच्या लगत जवळपास सात मीटर नांगरणी केली. या नांगरामुळे नदीतील गाळाचा मोठा थर बाजूला होईल. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी तलावाचे पाणी सोडण्याची विनंती चिमूर तहसीलदारांना केली आहे. तलावाचे सोडल्यानंतर नदी पात्रात ते जिरेल. यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर वाढेल, या आशेने चिमूर नगरपालिकेने नदी पात्रात नांगरणी केली. सदर प्रकार सर्वांनाच आश्यर्चकारक होता. त्यामुळे प्रकरणाची चिमूर शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई