शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:40 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन' लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले.

ठळक मुद्देमनपाचा पुढाकार : प्लास्टिक बॉटल टाकल्यास डिस्काऊंट कुपन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन' लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले.चंद्रपूर शहरात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वापर केल्यावर त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या दृष्टीने मनपाने बँक आॅफ महाराष्ट्रच्या सहकार्याने रिव्हर्स व्हेंडिंग मशीन मनपा परिसरात लावण्यात आली आहे. या मशीनमधे कुठल्याही नागरिकाने त्यांच्याकडे असलेली जुनी बॉटल टाकल्यास प्लास्टिकमुक्तीकडे त्यांनी टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून शहरातल्या नामांकित खाद्यगृहांमधे वापरता येणारे डिस्काउंट कूपन मिळणार आहे. एनडी हॉटेल, सॅफ्रोन रेस्टारंट, सिद्धार्थ हॉटेल, मामा जलेबी सेंटर, मॉर्सल्स रेस्टोरंट, त्रिमूर्ती संजय लस्सी सेंटर इत्यादी नामांकित खाद्यगृहांमधे कूपनचा वापर केल्यास ५ ते १० टक्के डिस्काउंट खाद्यपदार्थांवर मिळणार आहे. २३ मार्च २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात पूर्णत: प्लास्टिक बंदी आहे. तरीही प्लास्टिकचा सार्वजनिक जीवनात वापर पाहिजे तितका कमी झालेला नाही. मनपातर्फे दंडात्मक कारवाईही अनेकदा करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्लास्टिक कचº्याची पयार्यी व्यवस्था म्हणून मनपाने रिव्हर्स व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे.या मशीनमधे ५००० पर्यंत बॉटल्स जमा केल्या जाऊ शकत असून प्लास्टिक बॉटल टाकल्यानंतर तिचे तुकडे होऊन ती कच्च्या स्वरूपात परिवर्तित होते. कच्च्या स्वरूपातील प्लास्टिकपासून टी. शर्ट, बॅग्स इत्यादी अनेक स्वरूपाच्या वस्तू बनविल्या जाऊ शकतात. यादृष्टीने मनपा लवकरच समोर प्रक्रिया करणार असून नागरिकांनी प्लास्टिक बॉटल्स रस्त्यावर, कचरापेटीत टाकण्याऐवजी रिव्हर्स व्हेंडिंग मशीनमधे टाकण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. मशीनच्या लोकार्पणाला महापौर अंजली घोटेकर व संजय काकडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसेवक नंदू नागरकर, प्रदीप किरमे, दीपक जयस्वाल, बँक आॅफ महाराष्ट्रातर्फे प्रशांत गजभिये, पालकमंत्री फेलो पूजा द्विवेदी उपस्थित होते.