चंद्रपूर : फार्मसिस्ट फोरम चंद्रपूर, मी टू व्हुई फाऊंडेशन नागपूर व हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात २५ औषधी फळझाडाची लागवड करण्यात आली. यावेळी चंद्रपूर फार्मसिस्ट फोरमचे अध्यक्ष बंटी झा, मी टू व्हुईचे सदस्य पाठव, प्राचार्य डॉ. सतीश कोसलगे, पंकज देशमुख, गणेश झाडे, केतन निकम, उज्ज्वला घाटे, भारती वनकर, शालिका ठाकरे, संगीता खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आवळा, जांभूळ, चिक्कू, अजवाईन, रक्तचंदन अशा वेगवेगळ्या प्रजातीचे रोपटे लावण्यात आले. यावेळी पाहुण्यांनी मागील वर्षी लावलेल्या झाडांचे वैभव बघून आनंद व्यक्त करीत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. सतीश कोसलगे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुशील बुरले, डॉ. पंकज पिंपळशेंडे, डॉ. वसीम शेख यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हायटेक कॉलेजमध्ये २५ औषधी झाडांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST