शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

नियोजन कागदावर, कोविड रुग्ण वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजार २३१ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्याही १० हजार ९८१ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या कोविड तपासण्यांचे लक्ष आहे. गत आठवड्यापर्यंत तीन लाख २९ हजार ८४६ नमुन्यांची तपासणी झाली.   परिणामी, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. मात्र, रुग्णाचा शोध लागल्यानंतर सुविधांबाबतच्या दीर्घकालीन नियोजनाची अंमलबजावणी होण्यास मोठा विलंब होत आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा कोलमडली : बेड्स मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचे कुटुंबीय हादरले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑक्सिजन पातळी ८३ पर्यंत खालावलेल्या गंभीर कोविड रुग्णांनाही शासकीय रुग्णालयात बेडस्‌ मिळण्याचा मार्ग बंद झाला. मृतांची संख्याही वाढत आहे. खासगी रुग्णालयांत उपचार करण्याची गरिबांची क्षमता नाही. त्यामुळे बेड्स मिळेल काही नाही, याचा विचार न करता अखेरचा पर्याय म्हणून अश्रु गोठवून आपल्या जीवलग व्यक्तीच्या उपचारासाठी तेलंगणात जाण्याची घटना रविवारी पुढे आली. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजार २३१ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्याही १० हजार ९८१ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या कोविड तपासण्यांचे लक्ष आहे. गत आठवड्यापर्यंत तीन लाख २९ हजार ८४६ नमुन्यांची तपासणी झाली.   परिणामी, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. मात्र, रुग्णाचा शोध लागल्यानंतर सुविधांबाबतच्या दीर्घकालीन नियोजनाची अंमलबजावणी होण्यास मोठा विलंब होत आहे. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड्सची क्षमता संपली. कोविडबाधित गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास बेड्स उपलब्ध नसल्याने आरोग्य प्रशासनाने हात टेकल्याचा    वेदनादायी अनुभव रुग्णांच्या कुटुंबीयांना येत आहे.  जिल्हा प्रशासनाने सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.

केवळ डॅशबोर्डावरच बेड्स शिल्लकजिल्ह्यात ऑक्सिजन ६४०, आयसीयू १७२ व व्हेंटिलेटर्स ७८ बेड्स ही संख्या केवळ शासकीय नव्हे तर यात खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. सोमवारी जनरल खाटांसह एकूण एक हजार १३१ खाटा उपलब्ध असून, शासकीय व खासगी अशा २५ रुग्णालयांची ही स्थिती आहे. सायंकाळी ६ वाजतापर्यंत एक हजार ८३ रुग्ण भरती आहेत. ऑक्सिजनचे ४ व व्हेंटिलेटरचे ५ बेड्स  केवळ डॅशबोर्डवर शिल्लक आहेत.

शासकीय रूग्णालयांची क्षमता संपली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन १४०, आयसीयू ४० व ४० व्हेंटिलेटर्स बेड्सची क्षमता आहे पण, सर्वच बेड्स फुल्ल असल्याने बेड्सअभावी कोविड रुग्ण भरती करणे थांबविले. राजुरा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या २३ बेड्स आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर्स बेड्सची व्यवस्था नाही. ऑक्सिजनच्या १७ व आयुसीयु २१ खाटांची क्षमता असलेल्या रामनगरातील महिला रुग्णालयात रामनगरात व्हेंटिलेटर्स बेड्स नाहीत. चंद्रपूर कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या ८० खाटा आहेत पण, व्हेंटिलेटर्स बेड्स नाही. एसडीएच वरोरा रूग्णालयातही आयुसीयू व व्हेंटिलेटर्स नाही. १८ ऑक्सिजन बेड्स आहेत. मात्र, त्या फुल्ल झाल्या. त्यामुळे कोविडबाधितांचे कुटुंबीय हादरले आहेत.

‘रस्त्यावर मरण्यापेक्षा तेलंगणात जाऊ’ चिमूर तालुक्यातून कोरोनाबाधित एका महिलेला उपचारासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून रविवारी दुपारी चंद्रपुरातील महिला रुग्णालयात आणले होते. बेड्स उपलब्ध नसल्याने अ‍ॅडमिट करून करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. रुग्णाला रुग्णवाहिकेतच ठेवून कुटुंबीयांनी सायंकाळी सहा वाजतापर्यंत वाट पाहिली. अखेरचा प्रयत्न म्हणून कुटुंबाने माध्यमांशी संपर्क साधल्यानंतर थोड्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, काही उपयोग न झाल्याने ‘रस्त्यावर मरण्यापेक्षा तेलंगणात नेऊ’ या शब्दांत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून  हे कुटुंब रात्री उशिरा तेलंगणाकडे रवाना झाले.   

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या