शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

भारोसा येथील अल्का गोखरे या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील बहिणीकडे जात होत्या. वरोडा या गावाजवळ मोठ-मोठे खड्डे पडून असल्याने मोटारसायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या हायवा ट्रक (क्रमांक एमएच ३४ एन १५७१) अल्का यांच्या अंगावरून गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राजुरा/सास्ती : राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावासमोर असलेल्या खड्ड्यांमध्ये मोटारसायकल उसळल्याने अल्का भास्कर गोखरे (४५) या खाली पडल्या. त्याच वेळी मागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वरोडा वस्तीनजीक बुधवारी सकाळी ८:३० वाजता घडली.नागरिकांनी व मृताच्या नातेवाईकांनी कुटुंबियांना नुकसानभरपाईची मागणी करत सात तास वाहतूक रोखून धरली. बराच वेळ तोडगा न निघाल्याने वातावरण चिघळले व  संतप्त युवकांनी अपघातग्रस्त ट्रकला आग लावली. त्यात ट्रकचा समोरचा भाग जळाला आहे.भारोसा येथील अल्का गोखरे या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील बहिणीकडे जात होत्या. वरोडा या गावाजवळ मोठ-मोठे खड्डे पडून असल्याने मोटारसायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या हायवा ट्रक (क्रमांक एमएच ३४ एन १५७१) अल्का यांच्या अंगावरून गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यानंतर नागरिकांनी वाहतूक रोखून धरली व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. संतप्त युवकांनी अपघातग्रस्त ट्रकला आग लावली. काही तासांनंतर राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृताचे नातेवाईक व नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी, याकरिता ट्रकमालकांशी संपर्क केला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमनची गाडी पोहोचून आग आटोक्यात आणली. त्यात ट्रकचा समोरील काही भाग जळाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम थांबले राजुरा-रामपूर-कवठाळा या मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे; परंतु सहा महिन्यांपासून या रस्त्याचे बांधकाम थांबले असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे तयार झाले आहे, धुळीचे लोंढे उडत असल्याने मोठ्या वाहनामागे असलेल्या मोटारसायकलस्वारांना रस्ता दिसत नाही. त्यात अनेकदा अपघात घडले आहेत. या रस्त्याच्या बांधकामासंबंधी गावागावांत रस्ता रोको आंदोलन झाले. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही.

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू