शेती मशागत व अन्य पूरक कामांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:00 AM2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:22+5:30

चंद्रपूर येथे कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेशी व्हिडिओ संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामाची सुरुवात करण्याची ही वेळ असून एकीकडे कोरोना आजाराशी लढताना दुसरीकडे शेतीच्या मशागतीकडे लक्ष देणेसुद्धा आवश्यक आहे.

Permission for farming and other ancillary works | शेती मशागत व अन्य पूरक कामांना परवानगी

शेती मशागत व अन्य पूरक कामांना परवानगी

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची माहिती : १० ते १२ दिवसात कोरोना लॅब सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शेतीपूरक सर्व उद्योग व्यवसाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखून आवश्यक कामांना सुरुवात करावी, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर येथे कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेशी व्हिडिओ संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामाची सुरुवात करण्याची ही वेळ असून एकीकडे कोरोना आजाराशी लढताना दुसरीकडे शेतीच्या मशागतीकडे लक्ष देणेसुद्धा आवश्यक आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, औषधी याचा तुटवडा पडणार नाही. सहज उपलब्ध होईल, याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले.
कापूस, तूर, धान, खरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर यांना शेतातील काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय शेती संदर्भातील काही कामे रोजगार हमी योजना अंतर्गत करता येतील का, याची चाचपणीदेखील केली जात असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

१२ ते १३ हजार धान्य किटचे वाटप
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ४० हजार अन्नधान्याच्या किट वाटप करण्याबाबतचे नियोजन आपण केले होते. मात्र १२ ते १३ हजार अन्नधान्याच्या किटचे आतापर्यंत वाटप करता आले. यामध्ये स्वयंसेवी संस्थांनी काही वाटा उचलला होता व काही वाटा आपण स्वत: उचलला होता. या वाटपामध्ये जिल्ह्यातील सामाजिक दायित्व निधीचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही, असा खुलासाही ना. वडेट्टीवार यांनी केला. अतिशय गरीब व गरजू असणाऱ्या नागरिकांना या किटचा वाटप करण्यात आला. दरम्यान सामाजिक दायित्व निधीचा वापर संपूर्णत: शासकीय यंत्रणेमार्फत होईल, यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. कोरोनामुळे सध्या ग्रामीण व गरीब वस्त्यांमध्ये कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी माणूसकीतून अतिशय सामंजस्याने मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तेलंगणामध्ये दहा हजार मजूर अडून
तेलंगानामध्ये १० हजार मजूर सध्या विविध जिल्ह्यांमध्ये अडकून आहेत. तेथील प्रशासनाची आमचा कायम संपर्क असून त्यांची उत्तम व्यवस्था व्हावी, यासाठी प्रयत्नरत आहोत. आई - बाबा तेलंगानामध्ये अडकून पडल्यामुळे मुलांची व कुटुंबाची आबाळ होत आहे. राजस्थानमधील कोटा येथे काही मुले अडकून पडली आहे. मात्र लोकांच्या संदर्भातील सर्व निर्णय आता केंद्र शासनाच्या हाती असून यासंदर्भातील पुढील निर्देश झाल्यास या लोकांना आपापल्या गावाला पोहोचण्यासाठी मदत केली जाईल, असेही ना. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
जिल्हा कोरोनामुक्तच
जिल्ह्यात दोन कोटी १८ लक्ष खर्च करून कोरोना आजाराची तपासणी करणारी प्रयोगशाळा उभी राहत आहे. पुढील १० दिवसात या ठिकाणी कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे. सध्या जिल्हयात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. नागपूरमध्ये सापडलेल्या मूळच्या चंद्रपूरच्या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळाल्याने ते निगेटिव्ह झाले आहेत. सध्या त्यांना निगराणीखाली नागपूर येथे ठेवलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापूर्वी कोणीही पॉझिटिव्ह नव्हते. या दोघांमुळे आता तर जिल्हा पूर्णत: कोरोनामुक्त आहे. मात्र जिल्हा कोरोनाच्या सावटातून बाहेर पडावा, यासाठी सर्वांनी प्रशासनाने दिलेले निर्देश पाळावे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

Web Title: Permission for farming and other ancillary works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.