महिला संघर्ष समिती : पोलीस अधीक्षकांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाढत्या अवैध दारू व ड्रग्सच्या विरोधात वैद्यनगर तुकुम येथील महिला संघर्ष समितीच्या वतिने बुधवारला शांती मार्च काढण्यात आला. व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.१७ मे रोजी वैद्य नगर तुकूम येथे नव्या मडावी या ६ वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला. या घटनेमुळे वैद्य नगरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वॉर्डातील असंख्य युवा मुले व्यसनाधीन झाले. या परिसरात अवैध दारू व ड्रग्स विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या युवा पिढीचे आयुष्य धोक्यात आहे. त्यामुळे या परिसरातील अवैध धंद्यावर आळा घालण्याच्या मागणीसाठी वैद्यनगर महिला संघर्ष समितीने वैद्यनगर पासून शहरातून मुख्य मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातपर्यंत शांती मार्च काढला. व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकाला भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निवेदनाचा स्वीकार करुन तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या शिष्टमंडळात समितीच्या अध्यक्ष प्रेमलता रहांगडाले नगरसेवक इंजि. सुभाष कासनगोट्टूवार, ताराबाई कोवे, अमीन शेख, आनंद इंगळे, शशी शंभरकर, वंदना रिठे, प्रेमिला भलमे, अपर्णा बोबडे, शशीकला इंगळे, नगरसेविका शिला चव्हाण, नगरसेविका माया उईके, प्रज्ञा बोरगमवार, चंदा ईटनकर, देवतळे, पुष्पा देवांगण, रेखाबाई सोनवने, मंगला बावणे, सुनिता नेवारे, रिना मुलमुले, कांचन काकडे, अनिता बावने, जरिना शेख, अरुणा सुर्यवंशी, आशा रामटेके आदी उपस्थित होते.
अवैध धंद्याच्या विरोधात शांती मार्च
By admin | Updated: June 2, 2017 00:42 IST