शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ग्राफपेपर पुरविलाच नाही

By admin | Updated: April 19, 2015 01:12 IST

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने आज रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर घेण्यात आला.

वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने आज रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर घेण्यात आला. प्रश्नपत्रिकेमध्ये साडेसात गुणांचा प्रश्न ग्राफ पेपरवर सोडविण्याकरिता विचारण्यात आला होता. परंतु परीक्षार्थ्यांना ग्राफपेपर उत्तर पत्रिकेसोबत देण्यातच आला नाही. त्यामुळे परीक्षार्थी त्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकले नाही. शेकडो परीक्षार्थी साडेसात गुणांपासून वंचित झाले आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने सेमीस्टर दोनमधील आज शनिवारी सर्वच केंद्रावर रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात आला. रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक एक मधील ए मध्ये पाच गुणांचा प्रश्न ग्रॉफपेपरवर आधारित तर प्रश्न क्र. १ मधील सी क्रमांकाचा अडीच गुणाचा प्रश्न लाँग टेबलवर आधारित विचारण्यात आला. प्रश्नपत्रिका हाती पडताच विद्यार्थ्यांची कुजबुज परीक्षा केंद्रावर सुरू झाली. एकमेकांना परीक्षार्थी लाँग टेबल व ग्रॉफ पेपरबाबत खुणावू लागले. ही कुजबुज रूममध्ये असणाऱ्या पर्यवेक्षकाकडे जाताच त्यांनी सखोल चौकशी करून काही परीक्षार्थ्यांना विचारणा केली असता प्रश्न पत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न ग्राफपेपर व लाँग टेबलशिवाय सोडवू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर ही बाब परीक्षा प्रमुख यांच्या कानावर टाकण्यात आल्याने धावपळ सुरू झाली. परंतु विद्यापिठाने ग्राफ पेपर व लाँग टेबल हे साहित्य पुरविण्याच्या कुठल्याही सूचना दिल्या नाही व प्रश्नपत्रिकेसोबतही पुरविण्यात आले नाही. त्यामुळे परीक्षेचा तीन तासांचा कालावधी लोटूनही ते विद्यार्थ्यांच्या हाती पडले नसल्याने परीक्षार्थी साडेसात गुणांपासून वंचित राहिले. गोंडवाना विद्यापिठातील भोंगळ कारभार मागील काही दिवसांपासून अनेकदा समोर आला आहे. आज ग्राफ पेपर व लाँग टेबलवर आधारित प्रश्न विचारून त्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे विद्यापिठाने परत आपला भोंगळ कारभार विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. (तालुका प्रतिनिधी)