शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनदृष्ट्या पकडीगुड्डम प्रकल्प उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष : पर्यटन विकास केल्यास पडणार महसुलात भर

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.कोरपना व जिवती तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर असलेला हा सिंचन प्रकल्प दोन्ही तालुक्याच्या शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून वरदान आहे. मात्र या सिंचन प्रकल्पातील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून उपसण्यात आला नाही. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला आहे. या सिंचन प्रकल्प अंतर्गत दोन कालवे आहेत. मात्र दोन्ही कालवे अस्वच्छतेने बरबटले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर अनेकदा पाणी पोहोचतच नाही. वनसडीकडून लोणीकडे जाणारा कालवा गेल्या कित्येक वर्षांपासून बुजला व फुटला गेला आहे. परंतु त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेकडे आजगायत दुर्लक्ष होत आहे.सिंचन प्रकल्पाच्या वेस्टवेअरलाही बºयाच ठिकाणी छोटी-मोठी गळती लागली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे. याठिकाणी कुठला सुरक्षारक्षकही तैनात नसल्याने प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत शासनाची उदासीनताच कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.प्रकल्प पकडीगुड्डमला; कार्यालय गडचांदूरलाकोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे. येथील कार्यालयीन कर्मचारी संख्याही बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणेही आवश्यक आहे.विकास नाहीहा प्रकल्प माणिकगड पहाडाच्या अगदी लगत असल्याने, हा संपूर्ण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास केल्यास येथील पर्यटन फुलून विकास साधला जाईल. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून शासनालाही पर्यटनातून महसूल प्राप्त होईल.सदनिका दुर्लक्षितचपकडीगुड्डम सिंचन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाºयासाठी साधारणता २८ वर्षांपूर्वी चंद्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली येथे सुसज्ज वसाहत तयार करण्यात आली. परंतु निर्मितीची अनेक वर्ष लोटूनसुद्धा आजपर्यंत वसाहतीत कुणीही वास्तव्यास आले नसल्याने सदर सदनिका आजही ओस पडल्या आहेत. इमारतीचीही बरीच नासधूस झाली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनdam tourismधरण पर्यटन