शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी धान पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, ........

ठळक मुद्देसर्वेक्षणाची मागणी : आलेवाही, नवेगाव शिवारातील पिके प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची अडवणूक होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.मूल तालुक्यातील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्ची घालूनही हजार रूपयाचेही उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगाव व गांगलवाडी या शिवारातील नुकसानीचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे.याच शिवारातील काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्चही व्यर्थ गेला आहे.पाणी वितरण समितीचे दुर्लक्षयंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु ही समिती शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न राहता स्वत: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती