शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील २१ हजारावर शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळणे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:51 IST

शेतकरी आर्थिक संकटात : खरिपापूर्वी बोनस वितरित करण्याची मागणी

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान विक्री केलेले २० हजार ६७३ शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. पणन महासंघाची आकडेवारी यापेक्षा वेगळी असून ती यापेक्षाही जास्त आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शासनाने हा बोनस वितरित करण्यात यावा अशी मागणी आहे.

मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाने भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. असे असले तरी ही घोषणा अद्याप हवेतच आहे. यावरून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मुख्य पीक धानाचे आहे. आणि याच पिकावर तालुक्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य तालुक्यातही धानाचे पीक घेतल्या जाते. मात्र निसर्गाचा लहरीपणा, धानाचे पीक अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर विविध रोगांचे आक्रमण, धान हातात आल्यानंतर भाव पडणे या प्रकाराने शेतकरी पुरते डबघाईस आले आहेत. कित्येक शेतकऱ्यांची शेती करण्याची इच्छा नाही. पण दुसरा कोणताही काम किंवा उद्योग नाही. त्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव शेती करीत आहेत.

२० हजार रुपये हेक्टरी बोनसच्या रूपात सानुग्रह मदत देत आहे. मागील वर्षी मे महिन्यातच ही सानुग्रह मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. आणि शेतकरी जोमाने कामाला लागले होते.

गतवर्षी मिळाली होती मदतया शेतकऱ्यांना उभारी मिळावी यासाठी शासन मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनसच्या रूपात सानुग्रह मदत देत आहे. मागील वर्षी मे महिन्यातच ही सानुग्रह मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. आणि शेतकरी जोमाने कामाला लागले होते.

शेतकऱ्यांना हवे पैसेयावर्षी जून महिना लागूनही या सानुग्रह मदतीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग दाटून येत आहेत. आता खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक बाबींसाठी पैशाची गरज भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेऊन शासनाने बोनस वितरित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पणनची आकडेवारी मोठीचंद्रपूर जिल्ह्यात पणन महासंघाची मोठी खरेदी आहे. दरम्यान सदर प्रतिनिधीने पणन महासंघाकडे किती शेतकऱ्यांनी खरिपामध्ये नोंदणी केली होती, ही विचारणा करण्यासाठी पणन महासंघाच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तरीही पणन महासंघाचे खरेदी केंद्र लक्षात घेता आदिवासी विकास महामंडळाच्या नोंदणी पेक्षा पणन महासंघाकडे शेतकरी नोंदणी अधिक असावी असा अंदाज आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेती