शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे, रविवारी आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ३४ बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्यातही बहुतेक बाधित हे संपर्कातूनन पुढे आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊन नोंद व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी ९४ रुग्णांची भर : आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना संसर्गाने कहरच केला आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल ९४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतचा एका दिवसात वाढलेल्या रुग्णाां हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १४४८ झाली असून ९५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४८० जणांवर उपचार सुरू आहे.विशेष म्हणजे, रविवारी आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ३४ बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्यातही बहुतेक बाधित हे संपर्कातूनन पुढे आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊन नोंद व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील व परिसरातील ३४, वरोरा येथील १३, बल्लारपूर येथील आठ, कोरपना व मूल येथील प्रत्येकी आठ, भद्रावती येथील दोन, पोंभुर्णा व सिंदेवाही येथील प्रत्येकी एक, नागभीड येथील १०, राजुरा येथील पाच, ब्रम्हपुरी येथील चार अशा ९४ बाधितांचा समावेश आहे.चंद्रपूर शहरातील गोपालपुरी वार्ड, हनुमान नगर तुकुम परिसरातील, रामनगर, दादमहाल वार्ड, वडगाव, पडोली, बाबुपेठ, पठाणपुरा वार्ड, बालाजी वार्ड इत्यादी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत.वरोरा येथील अभ्यंकर वार्ड, कर्मवीर वार्ड परिसरातील बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड परिसरातील बाधित ठरले आहेत.कोरपना शहरातील तसेच तालुक्यातील गिरगाव येथील बाधित पुढे आले आहेत. राजुरा, विरुर, गांधी चौक टेंभुरवाही परिसरातील बाधित ठरले आहेत. मूल तालुक्यातील बाधितांमध्ये कवडपेठ, फिस्कुटी, कांतापेठ येथील बाधितांच्या समावेश आहे.नागभीड तालुक्यातील बाळापूर, चिखल परसोडी येथील नागरिक बाधित ठरले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेवनगर तसेच तालुक्यातील मेंडकी, गांगलवाडी येथीलही काही जणाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहेत.आणखी एकाचा मृत्यूजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ५५ वर्षीय बाजार वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होता, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या बाधिताचा १९ ऑगस्टला स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर २२ ऑगस्टच्या सायंकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १३ वा मृत्यू आहे.सर्वाधिक बाधित तरुणचजिल्ह्यात आतापर्यंत १४४८ बाधित पुढे आले आहेत. यापैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील २९ बाधित, ६ ते १८ वर्ष वयोगटातील १२२ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ८१३ बाधित आहेत. ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ३६९ बाधित, ६१ वर्षावरील ८५ बाधित आहेत. तसेच एकूण १४४८ बाधितांपैकी ९८६ पुरुष तर ४६२ बाधित महिला आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या