शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, 123 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी  मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अ‍ॅन्टीजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले.

ठळक मुद्देबाधित महिलेचा मृत्यू : शहरी व ग्रामीण भागातही दररोज वाढताहेत रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, कोरोना गेल्याच्या भ्रमात राहून बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना शुक्रवारी जोरदार धक्का बसला. एकाच दिवशी तब्बल १२३ जणांना कोरोनाची बाधा झाली तर एका महिलेचा मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन व आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढवली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच बाधितांवर उपचार करण्यासाठी  मूलभूत सुविधा निर्माण केल्या. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर हेल्थ सेंटर व प्रत्येक तालुक्यात अ‍ॅन्टीजेन तसेच आरटीपीआर चाचण्यांसाठी केंद्र तयार केले.

चंद्रपूर हॉट स्पॉट होण्याची भीतीजिल्ह्यात बाधितांची संख्या २४ हजार ४९ वर पोहोचली. सध्या ५०२ बाधित उपचार घेत आहेत. दोन लाख १९ हजार ७७७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ९३ हजार ५१८ नमुने निगेटीव्ह आले. मात्र, चंद्रपूर शहरातच रूग्णसंख्या वाढत असल्याने हॉट स्पॉट होण्याची भीती आहे. 

त्रिसुत्रीचा विसर महागात पडणारनियमित मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही साधी त्रिसूत्री पाळण्याचे भान नागरिकांना राहिले नाही. त्यामुळे शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १२३ जणांना बाधा झाली. जिल्ह्यात २४ तासात ५४ जणांनी कोरोनावर मात केली तर बल्लारपूर येथील ६८ वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

१९५९ जणांनी घेतली कोरोनाची लसशुक्रवारी १,९५९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. १९०० जणांना लस देण्याचे टार्गेट होते. यामध्ये आरोग्य कर्मचार, ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक तसेच ६० वर्षांवरिल ज्येष्ठांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लस टोचून घेतली.

तालुकानिहाय रूग्णआज बाधित आढळलेल्या १७६ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात ३३, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड तीन, सावली १९, राजूरा आठ, चिमूर सहा, वरोरा ५९, कोरपना १४, जिवती २० व इतर ठिकाणच्या तीन रूग्णांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या