बाल विकास मंच चंद्रपूरतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

By Admin | Updated: January 24, 2016 00:59 IST2016-01-24T00:59:22+5:302016-01-24T00:59:22+5:30

बाल विकास मंचतर्फे ३१ जानेवारी रोजी रविवारीला १२ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing various competitions for the children's development platform Chandrapur | बाल विकास मंच चंद्रपूरतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

बाल विकास मंच चंद्रपूरतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

चंद्रपूर : बाल विकास मंचतर्फे ३१ जानेवारी रोजी रविवारीला १२ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल विकास मंच सदस्यांना मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. यावेळी एकल नृत्य स्पर्धा, युगल नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून यासाठी ५ ते ८ वर्षे ‘अ’ गट व ९ ते १५ वर्षे ‘ब’ गट ठेवण्यात आला आहे.
यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पाच बक्षीसे देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे बाल विकास मंच जिल्हा संयोजक सुरज गुरनुले (९५४५१९८७५२) यांच्याकडे नोंदवावी. स्पर्धकांनी आपली सीडी स्वत: तयार करून आणावी लागेल. एकल नृत्य स्पर्धेसाठी चार मिनीटे, युगल नृत्य स्पर्धेसाठी पाच मिनिटे व एकपात्री अभिनयासाठी तीन मिनीटे देण्यात येईल. कार्यक्रमाला परीक्षक स्पर्धेचे मुल्यांकन करतील व स्पर्धेचे सर्व नियम आयोजकांकडे राखून ठेवलेले आहेत. उशिरा आलेल्या नावाचा विचार केला जाणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Organizing various competitions for the children's development platform Chandrapur