शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

एक गाव २४ तास पाणी देणारे !

By admin | Updated: June 8, 2014 23:46 IST

उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली.

नीळकंठ नैताम- देवाडा(खुर्द)उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे.  थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली. दरवर्षी लाखोंचा खर्च होऊनही पाणी टंचाई कायमच. मात्र या प्रकाराला जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील चेकहत्तीबोडी गाव अपवाद ठरत आहे. ही किमया साधली आहे, सौर ऊज्रेने. या ऊज्रेचा वापर करीत गावकर्‍यांनी नियोजनबद्धरीत्या पाणी प्रश्न मिटविला. आता या गावात २४ तास पाणी मिळत असून स्थानिक मायमाऊलींची पाण्यासाठी होणारी ससेहोलपटही थांबली आहे.पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी हे गाव लोकसंख्येच्या विस्ताराने फार लहान असून याठिकाणी ३८५ नागरिक वास्तव्यास राहतात. येथे दोन विहिरी व एक हातपंप अशी पाण्याची व्यवस्था होती. मात्र विहिर व हातपंपांच्या पाण्याची पातळी एप्रिल महिन्यापासून खोल जायची आणि स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. अशातच ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षीच्या वाढत्या लोकसंख्येमुळे परत पाण्याची कमतरता भासत गेली. या परिस्थितीवर कशी मात करावी, हाच प्रश्न गावात चचर्िेला जाऊ लागला. अखेर चकहत्तीबोडी गावात एका हातपंपावर मोटरपंप बसविण्यात आले व त्याला सौरऊज्रेने जोडण्यात आले. त्यावरुन गावात दोन ठिकाणी सार्वजनिक नळ देण्यात आले. सोबतच आठशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविण्यात आली. स्वच्छ सुर्यप्रकाशाने सौरऊज्रेवरील मोटरपंप कार्यान्वित झाला. गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले. विजेची तर बचत झालीच पण गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले.या गावातील शेतकरी अनिल सातपुते म्हणाले, गावात सौरऊज्रेवरील पाणी पुरवठा सुरू झाल्याने या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. वर्षभरापासून कुणालाही शेतात किंवा इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागत नाही. शेतमजुरी करताना पाण्यासाठी मोठी पंचायत व्हायची. परंतु आता नळाचे मुबलक पाणी मिळत असल्याने मजुरीही बुडत नाही आणि पाण्यासाठी भटकंतीही करावी लागत नाही.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या गावाची निवड करून सौरऊज्रेच्या माध्यमातून आठशे लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीद्वारे स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले असून २४ तास पाणी देणारे चकहत्तीबोडा हे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावांनी घेतली तर मोठय़ा प्रमाणात पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.