महिला बचत गटांवर संकट : अन्न शिजवण्यात अडचणीपोंभुर्णा : तालुक्यातील अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्याचे काम केलेल्या बचत गटातील महिलांना गेल्या सहा महिन्यापासून पोषण आहाराचा निधी मिलाला नाही. त्यामुळे बचत गटातील महिलांना तारेवरची कसरत करून विद्यार्थ्यांना सकस व पुरक आहार पुरवावा लागत आहे.तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण दिले जाते. आहार शिजवून पुरवठा करण्याची जबाबदारी बचत गटांकडे देण्यात आली. त्यानुसार बचत गटांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठीचा निधी शासनाकडून दिला जातो. आहार शिजविण्यासाठी इंधन खर्च म्हणून ४.९२ पैसे शासनाकडून दिले जाते. हा सारा खर्च बचत गटातील महिलांना करावा लागतो.माहे आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१६, जानेवारी, फेब्रुवारी २०१७ या महिन्याचे पोषण आहाराचे देयके अजुनही बचत गटांना प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. ३ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ४.९२ इंधन खर्च याप्रमाणे शासनाकडून अंगणवाडींना मिळतात. त्यातील पैसे इंधनावर खर्च होतात. एवढे अल्प मानधन मिळत असतानाही महिला बचत गटाकडून विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. आता मात्र पोषण आहाराची देयकेही विलंबाने मिळत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मानधन रक्कम देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषक व सकस आहार शिजवून देण्यासाठी बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेकडून इंधन खर्च म्हणून ४.९२ रुपये दिले जातात. परंतु गेल्या सहा महिन्यापासून या विभागाकडे निधी प्राप्त न झाल्याने येथील बचत गटांना पोषण आहार शिजविण्याचे बिल अदा करण्यात आलेले नाही.- एस.एच. राठोड, विस्तार अधिकारी, पोंभुर्णा
पोषण आहार निधी सहा महिन्यांपासून बंद
By admin | Updated: March 16, 2017 00:36 IST