जिल्ह्यात सध्या ६९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोस वितरीत करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत २५ हजार डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बुस्टर डोस कालावधीत बदल
१३ मार्चला कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले. मंगळवारी पहिल्या दिवशी ३५ जणांनी डोस घेतला. दरम्यान, लशीच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढविल्याच्या सूचना जारी केल्या. त्यामुळे पूर्वी २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घेणाºयांना आता ४ ते ६ आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
को-विन अॅपवर वाढली नोंदणी
लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला.
हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा व लस घेणाºया व्यक्तींना वापरता येतो. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात आॅपलाईन व आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातील को-विन अॅप नोंदणी करणाºयांची संख्या अत्यल्प होती. मात्र, १ मार्चपासून वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.
लसीकरणासाठी पुरावा
मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, पेन्शनची कागदपत्रे यापैकी कोणताही एक पुरावा लसीकरण व नोंदणीसाठी स्वीकारला जातो.
८५ हजार ९१९ जणांनी घेतला डोस
सोमवारी सायंकाळी पाच वाजतापर्यंत जिल्ह्यात ८५ हजार ९१९ जणांनी लस घेतली. चंद्रपूर शहरात सर्वाधिक ९ हजार ८८३ जणांनी डोस घेतला. एकूण लसीकरणात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधींची संख्या ४१ हजार ५६६ आहे.