शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

नव्या बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 5:00 AM

नव्या बाधितांमध्ये इंदिरा नगर अयोध्या चौक परिसर, दुर्गापूर, शक्तीनगर, जुनोना चौक बाबुपेठ, संजय नगर, बालाजी वार्ड, नकोडा, घुग्घुस, एकोरी वार्ड, शास्त्रीनगर, अंचलेश्वर वार्ड, अरविंद नगर, गौतम नगर, पठाणपुरा, नगीना बाग, चिचपल्ली, ऊर्जानगर, साईकृपा कॉलनी परिसर, तुकूम, इंदिरानगर, पडोली, विठ्ठल मंदिर वार्ड, राजीव नगर, वडगाव, स्नेह नगर, सुशील नगर, शिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ठळक मुद्दे२२८ बाधितांची भर : आतापर्यंत १२१९९ बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या या आठवड्यात बऱ्यापैकी कमी होत होती. मात्र बुधवारी पुन्हा हा आकडा वाढला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नव्या २२८ बाधितांची भर पडली आहे.आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १५ हजार २७७ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी १५१ बाधित कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १२ हजार १९९ झाली आहे. सध्या दोन हजार ८५१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १७ हजार ६९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.नव्या बाधितांमध्ये इंदिरा नगर अयोध्या चौक परिसर, दुर्गापूर, शक्तीनगर, जुनोना चौक बाबुपेठ, संजय नगर, बालाजी वार्ड, नकोडा, घुग्घुस, एकोरी वार्ड, शास्त्रीनगर, अंचलेश्वर वार्ड, अरविंद नगर, गौतम नगर, पठाणपुरा, नगीना बाग, चिचपल्ली, ऊर्जानगर, साईकृपा कॉलनी परिसर, तुकूम, इंदिरानगर, पडोली, विठ्ठल मंदिर वार्ड, राजीव नगर, वडगाव, स्नेह नगर, सुशील नगर, शिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.चार बाधितांचा मृत्यूशुक्रवारी जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात चिमूर तालुक्यातील ७६ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील ७० वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील ७२ वर्षीय पुरुष व भद्रावती येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २१४, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.असे आहेत तालुकानिहाय नवे बाधितनव्या बाधितांमध्ये १२४ पुरूष व १०४ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील १०१, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील आठ, मूल तालुक्यातील २२, गोंडपिपरी तालुक्यातील दोन, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १२, ब्रह्मपुरी तालुक्यातील २७, नागभीड तालुक्यातील १४, वरोरा तालुक्यातील सात, भद्रावती तालुक्यातील आठ, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली १२ तर भंडारा येथील एकाचा समावेश आहे.ग्रामीण भागातील नवे बाधितवरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्ड, शांतीवन लेआउट परिसर, माढेळी, बोर्डा, जिजामाता वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकी, शेष नगर, विद्यानगर, शांतीनगर, अरेर नवरगाव, हनुमान नगर, भवानी वार्ड, गजानन नगर, बोंडेगाव, पेठ वार्ड, प्रबुद्ध नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, कटारिया लेआउट, शिवाजीनगर, चंडिका वार्ड, डिफेन्स चांदा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मुसाभाई नगर, किटाळी, बाळापुर, अनुसया नगर, तळोधी, हनुमान मंदिर वलनी, गोवर्धन चौक परिसर,कोथुर्णा, भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, पार्डी, माणिक गड कॉलनी परिसर, आंबेडकर भवन परिसर वैशाली नगर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील नागाळा, चितेगाव, डोंगरगाव, चिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, दादाभाई नौरोजी वार्ड, रेल्वे वार्ड, श्रीराम वार्ड, कोठारी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या