नागभीड तालुक्यात अशा सोसाट्यांची संख्या ३३ असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
वास्तविक, या ३३ सोसायट्यांमधील काही सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. मात्र, मागील वर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. नंतर कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत गेले. म्हणूनच निवडणूक आयोगाने संबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या होत्या.
ग्रामपंचायतींच्या या निवडणुका पार पडत नाही, तोच गावागावांत असलेल्या सेवा सहकारी, आदिवासी, विविध कार्यकारी व अन्य विविध सोसायट्यांच्या कोरोनामुळे स्थगिती देण्यात आलेल्या, तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच राज्य शासनाच्या सहकार विभागाने केले होते. यासंबंधीचा आदेशही या विभागाने १२ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केला होता. ३१ मार्च २०२१ नंतर या निवडणुका घेण्यात याव्यात असेही या विभागाने म्हटले होते. मात्र, कोरोनाने पुन्हा मोठ्या प्रमाणावर डोके वर काढल्याने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या निवडणुकांना पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बॉक्स
३३ सोसायट्या निवडणुकीस पात्र
नागभीड तालुक्यात या वर्षभरात ३३ सोसायट्या निवडणुकीस पात्र आहेत. यात आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था बाळापूर, सेवा सह. संस्था तळोधी, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था नागभीड, सेवा सह. संस्था कोथुळणा, शारदा मजूर सहकारी संस्था कोर्धा, राजीव गांधी गिट्टीखदान मजूर सह. संस्था नागभीड, सेवा सह. संस्था जनकापूर, आदिवासी विविध कार्यकारी संस्था गोविंदपूर, सेवा सह. संस्था पळसगाव खुर्द, गृहलक्ष्मी महिला ग्रा. बि. सह. पतसंस्था नागभीड, लक्ष्मी ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था गिरगाव, वनश्री ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था गोविंदपूर, नागभीड नागरी सह पतसंस्था नागभीड, सागर अभिनव बहुउद्देशीय सह. संस्था वलनी, अन्नपूर्णा अभिनव बहुउद्देशीय सह. संस्था वलनी, राजेश्वर पा. घोनमोडे अभिनव बहुउद्देशीय सह. संस्था वाढोणा, स्व. वासुदेवराव पाथोडे अभिनव बहुउद्देशीय सह. संस्था डोंगरगाव या संस्थांसह गिरगाव येथील दोन अभिनव सह. संस्था आणि नागभीड येथील तीन संस्थांचा समावेश आहे.