आता जीवनाश्यक वस्तूंसह अन्य दुकानेही उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:45+5:30

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील.

Now other shops with essentials will also open | आता जीवनाश्यक वस्तूंसह अन्य दुकानेही उघडणार

आता जीवनाश्यक वस्तूंसह अन्य दुकानेही उघडणार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । जिल्ह्यांतर्गत करता येणार विनापास प्रवास, मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनेक भागात अडकलेले नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या सावटाखाली कायम आहोत. मात्र तरीही सोमवारपासून काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य दुकानांनाही उघडण्याचे परवानगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. मात्र ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडावी लागणार आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकारची दुकाने उघडे करण्याची परवानगी असणार आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू राहतील. सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील.
मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही सोमवार ते शनिवार या दिवसांसाठी फक्त उघडे राहतील रविवारी ही दुकाने बंद राहतील. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पासची यापुढे आवश्यकता राहणार नाही. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी प्रशासनाची परवानगी व पास घेणे बंधनकारक राहील.

ऑटोरिक्षा सुरू
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती या क्षेत्रापुरते केवळ रिक्षाचालकांना परवानगी असणार आहे. यामध्ये रिक्षाचालक व केवळ दोन प्रवासी एवढीच प्रवाश्यांची मुदत राहणार आहे. या प्रवासी क्षमतेच उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात येईल. दुचाकी वाहनावर केवळ एक व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर दोन व्यक्ती म्हणजेच तीन व्यक्तींनाच परवानगी असणार आहे.

हे बंदच राहणार
उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, गुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंदच राहील. जिल्ह्याच्या सीमा आजही बंद आहेत. आंतरराज्य व जिल्हा यांची मनुष्य वाहतूक याला पूर्णता बंदी आहे.

सार्वजनिक कार्यक्रम रद्दच
जिल्ह्यामध्ये घेण्यात येणारे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा विषयक प्रदर्शने व शिबिरे, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे आंदोलन, इत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

Web Title: Now other shops with essentials will also open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.