राजकुमार चुनारकर खडसंगीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या मजुरांकडून अकुशल काम करून घेण्यात येत आहे. या मजुरांना त्यांच्या गावाच्या परिसरात निर्धारित निकषानुसार कामे मिळून त्यांच्या कामासंदर्भातील असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आता काही ठराविक तालुक्यामध्ये थेट बचत गटाच्या धरतीवर मजुरांचे ‘श्रमिक गट’ स्थापन करण्यात येणार आहेत.राज्यातील एपीपीई (इटेन्सीव पार्टीसोपेटरी प्लानींग एक्सरसाईज) कार्यक्रम सुरू असलेल्या तालुक्यामध्ये आणि ज्या ठिकाणी एपीपीई कार्यक्रम सुरू नाही, अशा जिल्ह्यातील किमान एका तालुक्यात मनरेगांतर्गत मजुराचे हे श्रमिक गट स्थापन करण्यात येणार आहेत.दरम्यान, त्या अनुषंगाने मनरेगांतर्गतच्या कामामध्ये जिल्हास्तरावर पिछाडीवर असलेल्या व मजूर स्थलांतराचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या तालुक्यात आता मनरेगातंर्गत बचत गटाच्या धरतीवर मजुरांचे श्रमिक गट स्थापन करण्यात येणार आहे. अनेक मजूर कामाच्या शोधात शहरामध्ये कामासाठी स्थलांतरित होत असतात. त्यामध्ये अनेक मजुरांची मजुरीसुद्धा योग्य देण्यात येत नाही. त्यामुळे शासनाने सर्व मजुरांना काम गावातच मिळावे म्हणून मनरेगा योजना सुरू केली. श्रमिक गटांना होणारे फायदेप्रत्यक्ष कामाच्या गरजेप्रमाणे श्रमिक गट एकत्रित कामाची मागणी करू शकतील.एकाच कामावर गटातील सदस्यांना काम दिले जाईल. श्रमिक गटाच्या प्रमुख सदस्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कामाची विभागणी करून देतील.आठवडी सभांच्या माध्यमातून पुढील आठवड्यातील कामाची मागणीही त्यांना करता येईल.ग्रामपंचायतींनाही ग्राम रोजगार दिनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व श्रमिक गटासोबत बैठक घेऊन श्रमिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.मग्रारोहयोत १० दिवस काम केलेले असावेश्रमिक गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या मजुराने गेल्या आर्थिक वर्षात मग्रारोहयोनेतंर्गत किमान १० दिवस काम केले असणे क्रमप्राप्त आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत नोंदणीकृत व श्रमीक गट तयार करण्यासाठी पात्र मजुरांच्या कुटुंबाच्या जॉब कार्डच्या आधारे १० ते १५ कुटुंबाचा एक श्रमिक गट तयार करण्यात येईल. जवळपास राहणारे कुटुंब किंवा छोट्या वाड्या, पाडे यामधील मजुरांना एकत्रित करून हा गट स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांनी गावनिहाय श्रमिक गटात सहभागासाठी पात्र असलेल्या मजुरांची सभा घेऊन संकल्पना स्पष्ट करत श्रमिक गटांना मार्गदर्शन करणार आहेत. गटामध्ये समूह गट प्रमुख पद निर्माण करून गटाचे नेतृत्व दिले जाईल. गट स्थापन झाल्यानंतर त्यांना ‘युनिक आयडीटी नंबर’ प्रदान करण्यात येणार आहे.
आता मजुरांचेही श्रमिक गट
By admin | Updated: February 18, 2015 00:45 IST