शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

आता ‘पुष्य’ नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:54 IST

रोहिणी, मृग पाठोपाठ आद्रादेखील कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची आशा ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रावर होती. या नक्षत्रकाळात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली गेली. प्रत्यक्षात या नक्षत्रातही पावसाचा खंड पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे.

ठळक मुद्देचार नक्षत्रे गेली कोरडी : दुबार पेरणीचे जिल्ह्यावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रोहिणी, मृग पाठोपाठ आद्रादेखील कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची आशा ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रावर होती. या नक्षत्रकाळात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली गेली. प्रत्यक्षात या नक्षत्रातही पावसाचा खंड पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे. आता शनिवार २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली, मात्र हुलकावणीच दिली.आर्द्रा नक्षत्र काळात जोरदार पाऊस होणार असल्याचे भाकित हवामान विभागाने व्यक्त केले होते. ्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस तसेच सोयाबिनची पेरणी केली. प्रत्यक्षात १५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला. आता कोवळी पिके माना टाकत आहेत. बिजांकूर करपले आहेत, तर पेरणी झालेले बियाणे जमिनीत आद्रतेअभावी कुजायला लागले आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. त्यातच वन्यप्राणीही या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या नक्षत्राचे वाहन गाढव असल्याने अनियमित स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.पावसाच्या दडीने शेतकरी हैराणकापूस, सोयाबीन, तूर या पिकांची पेरणी झाली आहे. यापैकी काही शेतातील पिके आता कोमजली आहेत. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. पावसाने आणखी काही दिवस हुलकावणी दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे फार काही परिणाम पडणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, धान उत्पादक शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस