शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आता कच्चेपार जंगलातही सफारीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 5:00 AM

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी-कच्चेपार जंगल सफारीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण,  उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरपाम,  सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे उपस्थित होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी येथे भेट देत असतात.  कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाच्या नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी येथे केले.ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी-कच्चेपार जंगल सफारीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण,  उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरपाम,  सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे उपस्थित होते.मोहाडी नलेश्वर येथे १०० एकर जागेवर पर्यटकांकरिता हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. अगरबत्तीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे ६०० महिलांना रोजगार प्राप्त होईल. गौण वनउपजावर आधारित ४२ कोटी रुपयांचा प्रकल्पही येणार          असून या सर्व कामातून जवळपास दीड हजार नागरिकांना या भागात      रोजगार उपलब्ध होणार               असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते शामाप्रसाद जनवन योजनेंतर्गत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावाला सौर कुंपण, सौर दिवे, गावालगत साफसफाई इ. कामांसाठी १९ गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना सुमारे पाच कोटींचे धनादेश वाटप करण्यात आले. सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले.  जंगलाची वैशिष्ट्येकच्चेपार जंगल सफारी साठी ३८ किलोमीटर ट्रॅक तयार असून या भागात वाघ, बिबट, अस्वल इ. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षिप्रेमींसाठी हे जंगल नंदनवन असून  विविध प्रकारचे पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलात दोन तलाव व तीन पाणवठे आहेत. सफारी साठी ७ वाहने मंजूर करण्यात आली असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन