शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

आता लागणार दुप्पट पाणीपट्टी कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:41 IST

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनांची वार्षिक दैनंदिन देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनांची वार्षिक दैनंदिन देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. मात्र उत्पादन कमी आणि खर्चच जास्त असल्याने या योजनांना नवसंजीवनी देणाऱ्या शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान नाकारले आहे. त्यामुळे या योजनांचा खर्च भरून काढण्यासाठी पाणीपट्टी कर दुप्पट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये प्रति नळजोडणी ७२० रुपये पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. १७ आॅक्टोबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची १०० टक्के देखभाल दुरुस्ती ग्रामस्थांनी म्हणजेच लाभार्थ्यांनी स्वखर्चाने करावी व त्यासाठी पाणीपट्टीद्वारे निधी उपलब्ध करुन घ्यावा, यासाठी पाणीपट्टीवरील कमाल मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या वार्षीक देखभाल दुरुस्ती खर्चाचा अंदाज घेवून त्याअनुषंगाने पाणीपट्टीची आकारणी करणे व आकारलेल्या पाणीपट्टीची जास्तीत जास्त वसुली होईल, यासाठी प्रयत्न करणे हे संबंधीत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. यातून योजना स्वयंसंतुलीत होईल, असे शासनाने म्हटले आहे.जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीकरिता ५ कोटी ५० लाख रूपयाचा खर्च येते. मात्र पाणीपट्टी मागणी केवळ १ कोटी २४ लाख ३८ हजार एवढी आहे. या योजनेचा खर्च व पाणीपट्टीतील मागणी यातील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाणीपट्टी करामध्ये वाढ करणे आवश्यक झाले होते.सद्यस्थितीत खर्चाच्या प्रमाणात पाणीपट्टी आकारायची झाल्यास सरासरी ३ हजार २२० प्रतीनळधारक पाणीपट्टी आकारावे लागणार होते. या विषयावर ८ डिसेंबरच्या जलस्वस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेमध्ये चर्चा झाली.त्यानंतर प्रती घरगुती नळ जोडणी १५०० रूपये पाणीपट्टी कर एप्रिल २०१८ पासून आकारण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आली. हा विषय मंजुरीसाठी २२ डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता.या पाणीपट्टी करवाढीला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली असून आता दुप्पट पाणीपट्टी कर नळधारकांना भरावे लागणार आहे.घरगुती नळांना लागणार मीटरजिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची दैनंदिन देखभाल व दुरूस्ती जिल्हा परिषद स्तरावरून केली जाते. या योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील घरगुती व इतर नळ जोडणीला ग्रामपंचायत स्तरावरून मीटर बसवून पाणी पुरवठा केल्यास गरजेप्रमाणे पाण्याचा वापर होईल. दररोज होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळता येईल, यासाठी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत चर्चा झाली. या सभेत मीटर बसविण्याला मान्यता देण्यात आली. सदर विषय मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. या सभेत मंजूरी देण्यात आली असून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनअंतर्गत समाविष्ट गावातील नळांना लवकर मीटर लागणार आहेत.