आता चिमूरचे आमदार भांगडिया-देशमुखांच्या भेटीतून मनपात खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:08+5:302021-06-22T04:20:08+5:30

चंद्रपूर: चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपमधील नाराज नगरसेवक आणि मनपातील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांची सोमवारी भेट घेतली. ...

Now Chimur's MLA Bhangadia-Deshmukh's visit is disturbing | आता चिमूरचे आमदार भांगडिया-देशमुखांच्या भेटीतून मनपात खलबते

आता चिमूरचे आमदार भांगडिया-देशमुखांच्या भेटीतून मनपात खलबते

Next

चंद्रपूर: चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपमधील नाराज नगरसेवक आणि मनपातील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांची सोमवारी भेट घेतली. त्यामुळे आगामी स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचा एक गट माेर्चेबांधणी करीत आहे. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलल्या जात आहे. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीपासून मनपात भाजप नगरसेवकांचे दाेन गट झाले. गटनेते, सभागृह नेते आणि सलग चार वेळा निवडून आल्यानंतरही शेवटच्या क्षणी देशमुख यांच्याऐवजी रवी आसवानी यांना सभापतिपद मिळाले. तत्पूर्वी सभापतिपदाचे आश्वासन देशमुख यांना दिले हाेते. त्यासाठी त्यांच्याकडून सभागृह नेतेपदाचा राजीनामा झाला. मात्र त्यांना डावलले गेले. तेव्हापासून देशमुख नाराज आहे. याच निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांचे दाेन गट पडल्याचे दिसून आले. देशमुख यांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी पक्षांतर्गत विराेधक सक्रिय झाले असल्याचे बाेलले जात आहे.

आसवानी यांच्या सभापती पदाची मुदत एप्रिल महिन्यात संपली. काेराेनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता काेणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी चंद्रपूर दाैऱ्यात भाजपचे काही नगरसेवक आपल्याला भेटले, असा दावा केला हाेता. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता आहे. पटाेले यांच्या विराेधात पाेलिसात तक्रार करण्यात आली. मध्यतंरी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी देशमुख यांची भेट घेतली. आता भाजपचे आमदार बंटी भांगडिया थेट त्यांच्या घरी पाेहचले. त्यांनी देशमुख यांना काेणत्याही मदतीसाठी तयार असल्याचे आश्वासन दिल्याचे समजते. देशमुख गटनेते आहे. स्थायी समितीच्या रिक्त हाेणाऱ्या जागेवर कुणाला पाठवायचे याचा निर्णय देशमुख स्वत:च घेणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Now Chimur's MLA Bhangadia-Deshmukh's visit is disturbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.